...

(mg road pune) एमजी रस्त्यावरील फॅशन स्ट्रीटला भिषण आग (A fierce fire on Fashion Street)

पुणे ः लष्कर परिसरातील महात्मा गांधी रस्त्यालगतच्या फॅशन स्ट्रीटला शुक्रवारी रात्री अचानक मोठी आग लागली. संपुर्ण मार्केट आग आल्याने आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अडणत येत  होती. मात्र, कँटोन्मेंट अग्निशमन केंद्र आणि पुणे महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या 16 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून, रात्री उशिरापर्यंत आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रय़त्न सुरु होते. (A fierce fire on Fashion Street)

काही वर्षांपूर्वी पुणे कँटोन्मेंट बोर्डाच्या अग्निशमन विभागाने पुणे महापालिकेच्या अग्निशमन विभागासोबत फॅशन स्ट्रीटचे फायर ऑडिट केले होते. त्यामध्ये फॅशन स्ट्रीटला आग लागण्याची भीती वर्तविण्यात आली होती. त्यामुळे बोर्डाने गाळेधारकांवर कारवाईची मोहीमही हाती घेतली होती. त्या विरोधात फॅशन स्ट्रीटमधील व्यावसायिकांनी न्यायालयात धाव घेतली होती. त्यामुळे ही कारवाई थंड बस्त्यात पडली होती. (A fierce fire on Fashion Street)

बोर्डाच्या अध्यक्षांनी काही महिन्यांपूर्वी फॅशन स्ट्रीटची पाहणी करत नव्याने फायर ऑडिट करण्याच्या सूचना दिल्या होत्या, असे बोर्डाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. रात्री उशिरापर्यंत आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम सुरु होते. त्यामुळे त्यात जिवित हानी झाली की, नाही याची माहिती मिळू शकली नाही. मात्र, वित्त हनी मोठ्या प्रमाणात  (A fierce fire on Fashion Street)

A fierce fire on Fashion Street

Local ad 1