कोरोनामुळे निधन झालेल्या कर्मचाऱ्यांच्या स्मरणार्थ पुणे जिल्हा परिषद स्मारक उभारणार
मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांची माहिती
पुणे : पुणे जिल्हा परिषदेतील ३५ कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना कोरोनामुळे (Corona) जीव गमवावा लागला आहे. ते महामारीच्या काळात सेवेत सक्रिय कर्तव्यावर होते. एकतर रुग्णालयात सेवा देत होते किंवा आरोग्य संबधी काम करत होते. त्यामुळेच पुणे ग्रामीण भागात कोरोना आटोक्यात आणण्याचा प्रयत्न झाला परिणामी हजारो जीव वाचले. त्यामुळे त्यांचे स्मरण सातत्याने झाले पाहिजे, अशी भूमिका जिल्हा परिषदेची आहे. (Pune Zilla Parishad will erect a memorial in memory of employees who died due to Corona)
पोलीस विभाग (Police Department) आणि संरक्षण दलांकडून (Defense Force) प्रेरणा घेतली आहे ज्यांनी राष्ट्राच्या सक्रिय सेवेत प्राण गमावलेल्या त्यांच्या कर्मचार्यांच्या स्मरणार्थ अशी स्मारके बांधली आहेत. त्याच धर्तीवर पुणे जिल्हा परिषदेने अधिकारी आणि कर्मचारी यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. त्यांना आदरांजली वाहण्यासाठी जिल्हा परिषदेच्या आवारात स्मारक उभारण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे.(Pune Zilla Parishad will erect a memorial in memory of employees who died due to Corona)
आराखडा अंतिम करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. तसेच, समिती जिल्हा परिषद परिसर सार्वजनिक जमिनींचा वापर करण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकार, जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे महानगरपालिका आणि पुणे शहर पोलिसांच्या कडून सर्व परवानग्या घेणार आहे. सर्व परवानग्या घेतल्यानंतर आम्ही बांधकाम सुरू करणार आहोत, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद (Zilla Parishad Chief Executive Officer Ayush Prasad) यांनी दिली. (Pune Zilla Parishad will erect a memorial in memory of employees who died due to Coron