पुणे : जिल्हा परिषदेचे समाजकल्याण अधिकारी प्रविण कोरगंटीवार यांच्याकडे दिव्यांग आयुक्तालयातील सहाय्यक आयुक्त पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे. (Pune Zilla Parishad Social Welfare Officer Pravin Korgantiwar)
दिव्यांग कल्याण आयुक्तालयातील शिवाजी शेळके हे ३१ मार्च २०२३ रोजी सेवानिवृत्त झाल्यामुळे १ एप्रिल २०२३ पासून सहाय्यक आयुक्त पद रिक्त झाले होते. त्यामुळे प्रशासकीय कारणास्तव दिव्यांग कल्याण आयुक्तालयास नियमित सहाय्यक आयुक्त उपलब्ध होईपर्यंत या पदाचा अतिरिक्त कार्यभार कोरगंटीवार यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
Related Posts
कोरगंटीवार डिसेंबर २०२० पासून पुणे जिल्ह्याचे समाजकल्याण अधिकारी म्हणून काम पाहत आहेत. त्यांनी कोरोना काळात शरद भोजन योजनेअंतर्गत ३ लाख गरजू व्यक्तींना भोजन वितरण केले. यामध्ये दिव्यांगांची संख्या लक्षणीय होती. सध्या जिल्ह्यातील होतकरु विद्यार्थ्यांसाठी कमवा व शिका योजना,चवदार पाणी योजना, शाहू-फुले-आंबेडकर अभ्यासिका तसेच वैशिष्ट्यपूर्ण जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र आदी नाविन्यपूर्ण योजनांवर काम चालू आहे.
प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष धर्मेंद्र सातव तसेच संयुक्त दिव्यांग हक्क सुरक्षा समितीचे अध्यक्ष हरिदास शिंदे यांनी प्रविण कोरगंटीवार यांचा दिव्यांग कल्याण आयुक्तालयात सत्कार केला. यावेळी पुणे व नागपूर जिल्हा पुनर्वसन केंद्राचे समन्वयक अशोक सोळंके व अभिजीत राऊत उपस्थित होते.