...

Pune Zilla Parishad News । पुणे जिल्हा परिषदेतील धक्कादायक प्रकार ; अधिकारी म्हणतो, महिला कर्मचाऱ्याला माझ्याबरोबर डबा खायला बस !

Pune Zilla Parishad News पुणे : पुणे जिल्हा परिषदेत एक धक्का प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे. एका अधिकाऱ्याने महिला कर्मचाऱ्याशी लगट करण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार  करण्यात आली. आता ही तक्रार जिल्हा परिषदेच्या विशाखा समितीकडे (Visakha Committee of Zilla Parishad) वर्ग करण्यात आली आहे. त्यामुळे आता त्या शिक्षण अधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्याला विशाखा समितीसमोर उत्तर द्यावे लागणार असल्याची माहिती समोर आली आहे.  (In Pune Zilla Parishad, an officer tried to molest a woman officer)

 

जिल्हा परिषदेतील एका क्लास वन दर्जाच्या शिक्षण अधिकारी अधिकाऱ्याने एका महिला कर्मचारी बरोबर लंपट करण्याचा प्रयत्न केला आहे. त्या महिला महिला कर्मचाऱ्यांच्या हाताला हात लावण्याबरोबरच वारंवार ‘तू माझ्याबरोबर डबा खायला बस’ अशी लगट केली, याशिवाय अनेक कारणाने या अधिकाऱ्याने लंपटपणा केल्याचा तक्रार करण्यात आली.

 

संबंधित महिला कर्मचाऱ्याने यासंदर्भात प्रशासनाकडे तक्रार केली असून, ती जिल्हा परिषदेच्या विशाखा समितीकडे वर्ग करण्यात आली. त्यावर नियमाप्रमाणे सुनावणी होऊन पुढील कार्यवाही होणार आहे. त्यासाठीनोटीस देखील संबंधित शिक्षणाधिकाऱ्यांना बजावण्यात आल्याची माहिती समोर आली.
या अधिकाऱ्यांकडून वारंवार लंपटपणा होत असल्याने तसेच यासंदर्भात त्यांना जाणीव करून दिल्यानंतर देखील या अधिकाऱ्यांमध्ये फरक पडला नाही. वारंवार कक्षामध्ये बोलवून हाताला हात लावणे. स्पर्श करणे, दुपारच्या जेवणाचा डबा खायला माझ्याबरोबरच बस. कक्षामध्ये बसवून ठेवणे. त्याचबरोबर लंपटपणा अनेकदा या अधिकाऱ्याकडून झाल्याचे तक्रारीमध्ये म्हटले आहे.

 

 

 

Local ad 1