पुणे जिल्हा परिषदेला जिल्हा नियोजनकडून 321 कोटींचा अतिरिक्त निधी (321 crore from district planning to Pune Zilla Parishad)
पुणे : जिल्हा नियोजन समितीच्या जिल्हा वार्षिक योजनेतून जिल्हा परिषदेला या वर्षी 321 कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी मिळाला आहे. या निधीमधून मंजूर करण्यात आलेल्या कामांमध्ये काही त्रुटी असल्यास किंवा सूची बाहेरील काही कामे मंजूर झाले असल्यास त्याची पडताळणी करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार (Maharashtra Deputy Chief Minister Ajit Pawar) यांनी केले आहे. (Additional funds of Rs. 321 crore from district planning to Pune Zilla Parishad)
उपमुख्यमंत्री पवार यांनी जिल्हा परिषदेतील पदाधिकारी आणि अधिकारी यांची बैठक नुकतीच घेतली. जिल्हा नियोजन समितीकडून देण्यात आलेला निधी आणि मंजूर झालेल्या कामांच्या संदर्भात उपमुख्यमंत्री यांनी आढावा घेतला या बैठकीमध्ये झालेल्या निर्णयाची माहिती जिल्हा परिषद अध्यक्ष निर्मला पानसरे यांनी पत्रकारांना दिली. यावेळी उपाध्यक्ष रणजीत शिवतारे, सभापती प्रमोद काकडे, बाबुराव वायकर, पूजा पारगे, सारिका पानसरे. मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी भारत शेंडगे या वेळी उपस्थित होते. (Additional funds of Rs. 321 crore from district planning to Pune Zilla Parishad)
शाळांच्या वर्गखोल्या आणि दुरुस्तीसाठी 36 कोटी 15 लाख रुपये महिला आणि बालकल्याण विभागाला अंगणवाड्यांसाठी 27 कोटी रुपये. नागरी सुविधांसाठी 50 कोटी जन सुविधांसाठी 85 कोटी ग्रामीण रस्त्यांसाठी 64 कोटी आणि इतर जिल्हा मार्ग यांसाठी 32 कोटी लघु पाटबंधारे कामांसाठी 14 कोटी 73 लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. (Additional funds of Rs. 321 crore from district planning to Pune Zilla Parishad)
जिल्हा नियोजन समितीकडून मिळालेल्या नियतव्यय पेक्षा जादाचा निधी यंदा जिल्हा परिषदेला मिळाला. सदस्यांकडून आलेल्या शिफारशी मान्य करून कामांना मंजुरी देण्यात आली त्यामुळे जिल्हा परिषद सदस्यांचा कोणताही अधिकार डावलला गेला नाही. यामध्ये कोणाची तक्रार असल्यास त्यामध्ये बदल करून पालकमंत्र्यांकडे मांडू असे अध्यक्ष निर्मला पानसरे आणि उपाध्यक्ष रणजीत शिवतारे यांनी सांगितले. (Additional funds of Rs. 321 crore from district planning to Pune Zilla Parishad)