Pune ZP Recruitment 2023 : पुणे जिल्हा परिषदेत मोठी पदभरती होणार ; अभ्यासक्रम, पॅटर्न झेडपीच ठरविणार
Pune ZP Recruitment 2023 : पुणे जिल्हा परिषदेत विविध खात्यांतील ८८९ पदांसाठी भरतीप्रक्रिया राबविण्यात येत आहे. नोकर भरतीसाठी स्वतः झेडपी अभ्यासक्रम आणि परिक्षेचा पॅटर्न ठरविणार असून, परिक्षा एजन्सीमार्फत होणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद (Zilla Parishad Chief Executive Officer Ayush Prasad) यांनी दिली. (Pune Zilha parishad Recruitment; Syllabus, pattern will be decided by ZP)
जिल्हा परिषदेची कर्मचारी भरती गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेली आहे. यावेळी महाभरती अंतर्गत कर्मचारी भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भरतीसाठी इंडियन बैंकिंग पर्सनल सिलेक्शन अर्थात आयबीपीएस या संस्थेशी करार केला आहे. या एजन्सीमार्फत भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
जिल्हा परिषदेने भरती प्रक्रियासंदर्भात मसुदा जाहीर करून त्यावर हरकती आणि सूचना मागवल्या होत्या. जेणेकरून कोणत्या त्रुटी राहिल्यास शुद्धिपत्र काढण्यास लागू नये हा प्रमुख उद्देश होता. यामध्ये सुमारे तीन ते चार हजार सूचना आल्या. त्यामध्ये या एजन्सीने यापूर्वी घेतलेल्या प्रश्नपत्रिकेवर काही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.
एजन्सीमार्फत होणार उमेदवारांची परिक्षा
कर्मचारी भरतीसाठी संवर्गनिहाय रिक्त जागा एकूण ८८९ असल्या तरी या सर्व रिक्त जागांची पडताळणी आणि संवर्गनिहाय तपशील विभागीय आयुक्त स्तरावरून मंजूर केला जाणार आहे. एकूण ३४ संवर्गातील केली जाणार आहे. मात्र, त्यासाठी त्यांना जिल्हा परिषदेने या भरतीसाठी आयबीपीएस या संस्थेशी करार केला आहे.
अभ्यासक्रमाची पद्धत, पॅटर्न दिला जाणार आहे. त्यानुसार प्रश्नपत्रिका तयार होतील. तसेच परीक्षेच्या पाच मिनिटांपूर्वी प्रश्नपत्रिका संबंधित केंद्रावर पोहोचणार आहेत. त्यामुळे कोणत्याही प्रकारची प्रश्नपत्रिका लिक होणार नसल्याचे आयुष प्रसाद यांनी सांगितले.
कर्मचाऱ्यांची भरती होणार असून, त्याचे वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाईल. मात्र, प्रश्नपत्रिका योग्य पद्धतीने व त्या पदासाठी पूरक असणे क्रमप्राप्त आहे. जवळपास सर्वच संवर्गामध्ये रिक्त जागा आहेत, असे परिषद असल्याचे प्रशासनाकडन सांगण्यात आले आहे. (Pune Zilha parishad Recruitment; Syllabus, pattern will be decided by ZP)