Pune Rural Police पुणे : पुणे व पिंपरी-चिंचवड शहर पोलीस आयुक्तालय (Pune and Pimpri-Chinchwad City Police Commissionerate) आणि पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या (Pune Rural Police Force) पायाभूत सुविधेकरीता जिल्हा नियोजन समितीमधून ५० कोटी आणि सामाजिक उत्तरदायित्व निधीमधून ५० कोटी असे एकूण १०० कोटी उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. त्यापैकी ४१ कोटी रुपये मंजूर करण्यात येत असून, उर्वरित रक्कम लवकरच उपलब्ध करुन देण्यात येईल, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. (Rs 100 crore fund for infrastructure of Pune Police Force)