...

CNG prices । राज्याने दिले अन् केंद्राने नेले ; सीएनजीचाही उडाला भडका

पुणे : पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी वाढ नेहमीची झाली असून, आता सीएनजी गॅसचाही भडका उडाला आहे. तब्बव एका दिवसात सहा रुपयांनी सीएनजीचे दर वाढले आहेत. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने सीएनजीवरील कर कमी केला होता. त्यातच आता केंद्राने दर वाढवले आहे. त्यामुळे राज्य सरकराने दिलं ते केंद्र सरकराने लूटलं अशी चर्चा सुरु झाली आहे. (Rising CNG prices will hurt the common man)

 

 

पाच राज्यातील निवडणुका सुरु असताना पेट्रोल, डिझेल, सीएनजीचे स्थिर होते. परंतु निवडणुकांचा निकाल आल्यानंतर दरवाढीला सुरुवात झाली. पुण्यात सध्या पेट्रोल 120 रुपये आणि डिझेल 102 रुपयांपर्यंत प्रतिलीटर पोहचले आहे. गेल्या 22 मार्चपासून इंधनाच्या किमतीमध्ये सातत्याने वाढ होत असतानाच आता पुणेकरांना आणखी एक मोठा झटका बसला आहे. तो म्हणजे शहरात सीएनजीच्या (CNG) दरात देखील वाढ करण्यात आली आहे. सीएनजीच्या दरात जवळपास सहा रुपयांनी वाढ झाली आहे. पूर्वी सीएनजी गॅसची किंमत प्रति किलो 62.20 रुपये एवढी होती. मात्र आता सीएनजीचे दर 68 रुपये प्रति किलोवर पोहोचले आहेत. नवे दर मंगळवारी मध्यरात्रीपासून लागू करण्यात आले आहेत. (Rising CNG prices will hurt the common man)

 

 

 

 

मुंबईत देखील सीएनजी आणि पीएनजीच्या दरात मोठी वाढ करण्यात आली. मुंबईत सीएनजीच्या दरात प्रति किलोमागे सात रुपयांची तर पीएनजीच्या दरात प्रति किलोमागे पाच रुपयांची वाढ करण्यात आली आहे. नव्या दरानुसार आता मुंबईत सीएनजीची किंमत प्रति किलो 67 रुपये एवढी झाली आहे. पूर्वी एक किलो सीएनजीसाठी साठ रुपये लागत होते. तर पीएनजीच्या दरात पाच रुपयांची वाढ करण्यात आली असून, पीएनजीची किंमत प्रति किलो 41रुपये एवढी झाली आहे. (Rising CNG prices will hurt the common man)

दरम्यान, राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पामध्ये सीएनजीवरील व्हॅट कमी करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार एक एप्रिलपासून सीएनजीवरील व्हॅट साडेतेरा टक्क्यांनी कमी करण्यात आल्याने सीएनजी प्रति किलोमागे सहा रुपयांनी तर पीएनजी साडेतीन रुपयांनी स्वस्त झाला होता. (Rising CNG prices will hurt the common man)

Local ad 1