पुणे, गुढीपाडवाच्या मुहूर्त साधत तब्बल यंदा १० हजार १७० वाहनांची खरेदी करण्यात आली. यामध्ये दुचाकी वाहनांची संख्या सर्वाधिक म्हणजेच ६ हजार ५१० एवढी आहे. त्यानंतर कार, रिक्षा (Car, rickshaw) आणि अन्य वाहनांचा समावेश आहे. गुढीपाडवा, अक्षयतृतीया आणि दसरा (Gudipadwa, Akshaya Tritiya, Dussehra) या शुभ मुहूर्तावर वाहन घरी आणण्यासाठी नागरिकांची रेलचेल असते. विशेषतः गुढीपाडव्याच्या दिवशी वाहन, वस्तू खरेदी शुभ मानली जाते. हा मुहूर्त साधत अनेकजण घर, सोने, वाहन आणि इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांची खरेदी करतात. मुहूर्तावर वाहन घरी आणण्यासाठी अनेकजण अगोदरपासूनच बुकींग करून ठेवतात. (Pune residents buy 10000 vehicles on Gudi Padwa)
यंदा गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर वाहन खरेदीसाठी नागरिकांनी पसंती दिल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. त्यामुळे २० ते २८ मार्च या नऊ दिवसाच्या कालावधीत पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयात १० हजार १७० वाहनांची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये ६ हजार ५१० दुचाकी तर, २ हजार ४२४ कारची संख्या आहे. यानंतर रिक्षा आणि इतर वाहनांचा समावेश आहे. गतवर्षी हा आकडा ७ हजार ३३६ एवढा होता. त्यामुळे यंदा वाहन नोंदणीत तीन हजारांची वाढ झाल्याचे आरटीओच्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.
वाहन खरेदीसाठी नागरिकांना आकर्षित करण्यासाठी यंदा वाहन विक्रेत्यांकडून देखील आकर्षक योजना जाहीर करण्यात आल्या आहेत. दुचाकीवर हेल्मेट, अॅक्सेसरीज मोफत देवून ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. नागरिकांनी देखील या योजनेला प्रतिसाद दिल्याचे दिसून येते. पुण्यात दरवर्षी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मोठ्या प्रमाणात वाहनांची नोंद होते. यामध्ये सर्वाधिक संख्या ही दुचाकींची असते. यंदाही दुचाकींचे प्रमाण सर्वाधिक आहे. यंदा गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर वाहन खरेदी वाढल्याचे दिसून येत आहे.
वाहनखरेदी दृष्टीक्षेपात
२०२४ – २०२५
दुचाकी – ४ हजार २२१ – ६ हजार ५१०
चारचाकी – २ हजार ३२६ – २ हजार ४२४
मालवाहू वाहने – २४५ – ५१७
रिक्षा – २५७ – २८३
बस – ४५- ६८
टॅक्सी – १९० – २३४
अन्य वाहने – ५२ – १३४
दुचाकी – ४ हजार २२१ – ६ हजार ५१०
चारचाकी – २ हजार ३२६ – २ हजार ४२४
मालवाहू वाहने – २४५ – ५१७
रिक्षा – २५७ – २८३
बस – ४५- ६८
टॅक्सी – १९० – २३४
अन्य वाहने – ५२ – १३४