मोठी बातमी । पुणे रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी, एका प्रवाशाचा मृत्यू

Pune News Update : पुणे रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यात एका प्रवासी मृत्युमुखी पडला आहे. ही घटना रात्री नऊ वाजण्याच्या सुमारस घडली आहे. (Pune railway station stampede, one passenger killed)

 

 

पुणे-दानापूर एक्सप्रेसमध्ये चढणाऱ्या एका प्रवाशाचा मृत्यू झाला आहे. एक नंबरच्या प्लॅटफॉर्मवर पुण्याहून दानापूरच्या दिशेने जाणारी गाडी आली. गाडी येताच स्थानकावरील प्रवाशांनी गाडीत चढण्यासाठी एकच धावपळ केली. त्यातच एक प्रवासी खाली पडला. परंतु, खाली पडलेल्या प्रवाशाला उचलण्याऐवजी लोक त्याला चेंगरून रेल्वेत चढत होते, त्यात त्या प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला असल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेचा तपास पोलिस करत आहेत. (Pune railway station stampede, one passenger killed)

दिवाळीनिमित्त गावी जाणाऱ्या रेल्वे प्रवाशांची गर्दी मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. पुण्यातून बाहेर जाणाऱ्या रेल्वे गाड्यांना प्रचंड गर्दी होत आहे. अशा स्थितीत गावी जाण्यासाठी पुणे रेल्वे स्थानकावर शनिवारी रात्री पुणे ते दानापूर एक्सप्रेसला प्रचंड गर्दी झाली होती. याच गर्दीतून गाडीमध्ये चढत असताना प्रवासी खाली पडला आणि इतर प्रवाशांच्या चेंगराचेंगरीत तो गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली. (Pune railway station stampede, one passenger killed)

         साजन बलदेवन यादव (वय – 30 वर्षे, रा.मूळगाव – राम जालान मांझी वार्ड नं 5 , कंटी नवादा बीथीगया बिहार ) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तो शनिवारी पुणे-दानापूर एक्सप्रेसने घरी जाण्यासाठी निघाला होता. पुणे स्थानकावर सध्या दिवाळीच्या हंगामुळे मोठी गर्दी आहे. पुणे-दानापूर एक्सप्रेसमध्ये चढण्यासाठी रात्री ९ च्या सुमारास प्रवाशांनी गर्दी केली. या गर्दीत गाडीत चढण्याचा प्रयत्न करत असताना बोधा मांझे हा खाली पडला. दरम्यान, रेल्वे पोलिसांनी चेंगराचेंगरीमध्ये सदर व्यक्तीचा मृत्यू झाला नसल्याचे सांगण्यात आले आहे. (Pune railway station stampede, one passenger killed)

        दरम्यान, दानापूर एक्स्प्रेसने इसम नामे साजन यादव हे गेले 15 दिवसापूर्वी बिगारी कामाकरीता पुण्यात आले होते, मयत इसम हा आजारी होता सदर गाडी चढत असताना त्याला  पूर्वीपासून दम्याचा त्रास असल्याने त्यास अचानक जोरात खोकला येवून जीव घाबरा झालं म्हनून त्यास त्यांचे नातेवाईक यांनी खाली उतरवून मोकळ्या हवेसाठी त्यास बाहेर घेवून आले. व त्यानंतर तो व्यक्ती खाली पडून बेशुद्ध झाला. त्याला नंतर पोलिस यांनी रेल्वे स्टेशन वरील डॉक्टर यांनी तपासले असता त्यास मयत घोशित केले आहे. या व्यक्तीस कोणत्याही मारहाण अथवा दक्कबुक्की ची खुणा नाहीत. त्यासोबत त्याचे नातलग आहेत,अशी माहिती रेल्वे पोलिसांनी दिली आहे.

 

Local ad 1