(Pune police arrested a Nanded youth from Hyderabad) नांदेडच्या युवकाला पुणे पोलिसांनी हैद्राबाद येथून केली अटक
पुणे : ओळखीच्या महिलेला अश्लिल फोटो व्हायरल करण्याच्या धमकी देऊन दोन लाखांची खंडणी मागणाऱ्या नांदेडच्या तरुणाला पुणे पोलिसांनी हैद्राबात येथून अटक केली आहे. (Pune police arrested a Nanded youth from Hyderabad)
हंसराज बाबु गायकवाड (वय 31, रा. हैद्राबाद, मुळ सावरखेड, पो. घुंराळा,ता. नायगाव, जि. नांदेड) असे अटक केलेल्या आरोपी युवकाचे नाव आहे. याप्रकरणी, एका तरुणीने बंडगार्डन पोलिसांत फिर्याद दिली होती. त्यानुसार हंसराज गायकवाड याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. (Pune police arrested a Nanded youth from Hyderabad)
फिर्यादी महिला आणि आरोपी गायकवाड हे तीन वर्षांपूर्वी शेजारी रहायला होते. त्यांच्यात एकमेकांच्या ओळखीतून प्रेम संबंध निर्माण झाले होते. आरोपीने त्यातून त्यांचे काही अश्लिल फोटो नकळत काढले होते. गेल्या एक महिन्यांपासून तो या तरुणीला 2 लाख रुपये दे, नाही तर हे फोटो तुझ्या नातेवाईक, मित्रांना पाठवितो, अशी धमकी देत होता. गुन्हे शाखेच्या युनिट 2 याचा समांतर तपास करताना पोलीस अधिकारी समीर पटेल यांनी केलेल्या तांत्रिक विश्लेषणात आरोपी हा हैद्राबाद येथे असल्याची माहिती मिळाली. गुन्हे शाखेचे पथकाने हैद्राबाद गायकडवाडला ताब्यात घेतले. (Pune police arrested a Nanded youth from Hyderabad)
ही कामगिरी पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप, सहायक निरीक्षक वैशाली भोसले, उपनिरीक्षक आनंदराव पिंगळे, हवालदार संजय जाधव, अस्लम पठाण, किशोर वग्गु, उत्तम तारु यांच्या पथकाने केली. (A youth from Nanded was handcuffed by the Pune police from Hyderabad)