(Pune of tourism) पुणे जिल्ह्यातील पर्यटन स्थळे

पुणे : पुणे जिल्ह्यात असलेले गड किल्ले व इतर पर्यटनस्थळामुळे राज्य व परराज्यातील पर्यटन गर्दी करत असतात. मात्र, आता करण्यात आलेल्या सर्वेक्षणात जिल्ह्यात तब्बल  406 पर्यटन ठिकाणे असल्याची माहिती समोर आली आहे. या सर्व पर्यटन स्थळांच्या ठिकाणी भौतिक सुविधा उपलब्ध करुन जिले जाणार आहे. त्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली पर्यटन विकासासाठी बृहत आराखडा तयार करण्यात आला आहे. (Pune district is the home of tourism)

Pune of tourism
Pune of tourism

 विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुणे जिल्हा पर्यटन विकास आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी संपूर्ण जिल्ह्यातील पर्यटन विकास आराखड्याचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी यावेळी खासदार सुप्रियाताई सुळे, खासदार ॲड. वंदना चव्हाण, आमदार ॲड. अशोक पवार, आमदार संजय जगताप, आमदार सुनिल टिंगरे, आमदार सुनिल शेळके, आमदार चेतन तुपे, आमदार सिध्दार्थ शिरोळे, आमदार दिलीप मोहिते तसेच विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त राजेश पाटील, ‘पीएमआरडीए’चे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास दिवसे, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. (Pune district is the home of tourism)

 पुणे जिल्ह्यात पर्यटनासाठी अनेक ठिकाणे आहेत. पर्यटनाच्या ठिकाणी पार्कींग  व्यवस्था असावी. तसेच पर्यटनाच्या ठिकाणी चुकीचे प्रकार होणार नाहीत याची खबरदारी घ्यावी. जुन्नर तालुक्याप्रमाणे अन्य तालुके पर्यटनस्थळे घोषित होण्याबाबत प्रयत्न करावेत, असेही ते पुढे म्हणाले.यावेळी जिल्ह्यातील 406 पर्यटन स्थळांच्या (Pune of tourism) जमिनीची मालकी व कार्यरत मनुष्यबळ, लोणावळा येथील नियोजित नावीन्यपूर्ण पर्यटन उपक्रम, पिंपरी-चिंचवडमधील पर्यटन स्थळे, किल्ले सिंहगड विकास, भीमाशंकर येथील अतिक्रमण धारकांसाठी  अल्पोपहार केंद्र उभारणी, अतिक्रमण धारकांसाठी केलेली प्रस्तावित उपाययोजना, पुरातत्त्व विभाग, जिल्ह्यातील विशेष पर्यटन क्षेत्र, महोत्सवाच्या माध्यमातून पर्यटन विकास, कृषी पर्यटन, पर्यटनातून रोजगार निर्मिती, गड किल्ले पर्यटन विकासा संदर्भात अजित पवार यांनी सूचना केल्या आहेत. (Pune district is the home of tourism)

आपल्या भागातील बातम्या वाचण्यासाठी भेट द्या https://www.mhtimes.in/

Local ad 1