PMC NEWS । पुणे, महापालिकेच्या अंदाजपत्रकात (Budget 2025 – 26) भुसंपादनासाठी यंदा दाेनशे काेटी रुपयांची तरतुद केली जाणार आहे, अशी माहिती आयुक्त डाॅ. राजेंद्र भोसले (Municipal Commissioner Dr. Rajendra Bhosale) यांनी दिली. तसेच अंदाजपत्रकात लाेकप्रतिनिधींच्या मागणीचा विचार करताना, प्रशासनाची भुमिका महत्वाची असुन, त्यादृष्टीने तरतुद केली जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले. (Pune Municipal Corporation budget includes provision of Rs 200 crore for land acquisition)
Related Posts
सध्या महापालिकेचे २०२5 – २6 या आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक तयार करण्याचे काम प्रशासनाकडून सुरु आहे. महापािलका आयुक्त भाेसले यांनी विभागीय आयुक्त कार्यालयात बसुन हे अंदाजपत्रक तयार करण्यास सुुरुवात केली. गेल्या काही दिवसापासून महापालिकेचे अधिकारी हे विभागीय आयुक्त कार्यालयात अंदाजपत्रकाच्या बैठकीला जात होते. यावरून उलट सुलट चर्चा सुरु झाली हाेती. महापालीकेच्या अंदाजपत्रकावर राज्यातील सत्ताधारी महायुतीच्या आमदारांचा वरचष्मा असेल, त्यांच्याकडून सुचविल्या जाणाऱ्या काेट्यावधी रुपयांच्या कामासाठी अंदाजपत्रकात तरतुद केली जाणार आहे, अशी चर्चा सुरु झाली होती. या चर्चेला आयुक्त भाेसले यांनी पत्रकारांशी बाेलताना पुर्णविराम देण्याचा प्रयत्न केला.
शहरातील विविध विकास कामांकरीता भुसंपादन करणे आवश्यक आहे. यामध्ये रस्त्यांची कामे, मिसींग लिंक जाेडणे, विविध प्रकल्प आणि विकास कामांसाठी जागा ताब्यात न आल्याने विकास कामे मार्गी लागत नाही. विकास आराखड्याची अंमलबजावणी करण्यासाठी वीस वर्षांचा कालावधी असताे. या आराखड्यातील कामे मार्गी लावण्यासाठी भुसंपादन करावे लागत आहे, परंतु त्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधी आवश्यक आहे. हा निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी महापािलकेने राज्यसरकारकडे यापुर्वी केली आहे. जागा मालकाकडून टिडीआर पेक्षा राेख माेबदला मागितला जात असल्याने आर्थिक तरतुद करण्यासाठी महापालिकेला मर्यादा येत आहे. या पार्श्वभूमीवर आगामी आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकात दाेनशे काेटी रुपयांची तरतुद केली जाणार अाहे. यापुर्वी भुसंपादनाकरीता एवढ्या माेठ्या प्रमाणावर तरतुद केली गेली नाही असेही आयुक्त भाेसले यांनी नमूद केले.
लाेकप्रतिनिधींच्या पत्रांचा विचार केला जाईल
महापािलकेत सध्या नगरसेवक नाहीत, यामुळे आमदारांकडून त्यांच्या मतदारसंघातील कामांसाठी तरतुद करून घेण्यासाठी प्रयत्न सुरु आहे. सध्या शहरात सहा भाजपचे, एक आमदार अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काॅंग्रेसचा आणि एक आमदार हा शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काॅंग्रेसचा आहे. या आमदारांकडून मतदारसंघातील विविध विकास कामांसाठी काेट्यावधी रुपयांची तरतुद करण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात आयुक्त भोसले म्हणाले, ‘‘ लाेकप्रतिनिधींनी सुचविलेल्या कामांचा निश्चित विचार केला जाईल. परंतु महापािलकेच्या विविध विभागांचे त्यासंदर्भात काय भुिमका आहे. याचा विचार करूनच तरतुद केली जाईल.’’
‘‘ मिसींग लिंकसाठी राज्य सरकारकडे शंभर कोटी रुपयांची आणि रेल्वेच्या जागासंदर्भात ४०० काेटी रुपयंाची मागणी केली आहे. भुसंपादनासाठी काेट्यावधी रुपयांची गरज असुन, महापालिकेच्या अंदाजपत्रकात दरवर्षी त्या करीता तरतुद करावी लागेल’’ – डाॅ. राजेंद्र भोसले, (महापालिका आयुक्त, पुणे)