म्हाडा लॉटरी 2024 । पुण्यात घराचे स्वप्न म्हडा करणार पूर्ण करणार ; सहा हजार घरांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु
म्हाडा लॉटरी 2024। पुणे. म्हाडाच्या पुणे मंडळाच्या ६,२९४ घरांच्या सोडतीसाठीच्या अर्ज विक्री-स्वीकृती प्रक्रियेस गुरुवारी पुणे मंडळाचे सभापती शिवाजीराव आढळराव पाटील (Chairman of Pune Mandal Shivajirao Adharao Patil) यांच्या हस्ते गुरूवारी अर्ज विक्री-स्वीकृती प्रक्रियेचा सुरुवात करण्यात आली. यामध्ये पुणे, पिंपरी – चिंचवड, पीएमआरडीए, सोलापूर, कोल्हापूर आणि सांगलीतील (Pune, Pimpri – Chinchwad, PMRDA, Solapur, Kolhapur and Sangli) घरांचा समावेश आहे. अर्ज विक्री-स्वीकृती प्रक्रिया, सोडतपूर्व प्रक्रिया ३० नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. त्यानंतर म्हणजे ५ डिसेंबर रोजी या घरांच्या सोडतीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. (Pune MHADA will fulfill your dream of home, apply online)
पुणे मंडळाने २०२४ मध्ये आतापर्यंत दोन सोडती यशस्वीपणे काढल्या आहेत. तर काही दिवसांपूर्वीच मंडळाने तिसऱ्या सोडतीची घोषणा केली होती. त्यानुसार पुणे मंडळ क्षेत्रातील ६,२९४ घरांच्या सोडतीच्या अर्ज विक्री-स्वीकृतीला गुरुवारी सुरुवात करण्यात आली. अर्ज भरण्याच्या प्रक्रियेस गुरुवारी दुपारी १२ पासून सुरुवात झाली असून, अर्जदारांना अनामत रक्कम अदा करून अर्ज सादर करता येणार आहे. ही अर्ज विक्री-स्वीकृती प्रक्रिया १२ नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. संगणकीय पद्धतीने अनामत रक्कम भरून अर्ज दाखल करण्याची मुदत १२ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता संपुष्टात येणार आहे. तर बँकेच्या कार्यालयीन वेळेपर्यंत आरटीजीएस वा एनईएफटी द्वारे अनामत रकमेचा भरणा करून १३ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहे. त्यानंतर अर्ज विक्री-स्वीकृती प्रक्रिया पूर्ण होईल आणि प्राप्त अर्जांची छाननी सुरू होईल.
प्राप्त अर्जांची छाननी करून २३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता म्हाडाच्या https://housing.mhada.gov.in या संकेतस्थळावर पात्र अर्जांची प्रारूप यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यानंतर अर्जदारांच्या सूचना-हरकती सादर करून घेत ३० नोव्हेंबर रोजी पात्र अर्जदारांची अंतिम यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. पुण्यात ५ डिसेंबर रोजी सोडतीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे.
सोडतीचे वेळापत्रक
ऑनलाईन पेमेंट,अनामत रक्कम स्विकृती अंतिम मुद्त – दि.12 नोव्हेंबर 2024
सोडतीसाठी अर्जाची प्रारुप यादी प्रसिध्द -दि.23 नोव्हेंबर 2024
सोडतीसाठी अर्जाची अंतिम यादी प्रसिध्द- दि.30 नोव्हेंबर 2024
सोडत – दि.5 डिसेंबर 2024