पुणे म्हाडाच्या ऑनलाईन लाॅटरीत भाग्य उजाळले, पण विजेत्यांची यादी प्रसिद्ध होईना !

पुणे : गृहनिर्माण क्षेत्र विकास महामंडळातर्फे (Housing Sector Development Corporation) (म्हाडा) पुणे जिल्ह्यासाठी जानेवारी महिन्यात सहा हजार सदनिकांसाठी ऑनलाईन प्रणालीद्वारे सोडतीचा (Lottery draw through online system) निकाल नुकताच जाहीर करण्यात आळा. परंतु, ही प्रणाली पहिल्यापासून सदोष असल्याने विजेत्यांना घर देता का घर असे म्हणण्याची वेळ आली आहे. तर अनेक अर्जदार आपण प्रतिक्षा यादीत आहोत किंवा नाही माहित नसल्याने संभ्रमावस्थेत आहेत.(Pune MHADA got a house in online lottery, but the list of winners is not published!)

 

 

 

       राज्य सरकारने क्षेत्रविकास मंडळांतर्गत असणार्‍या प्रकल्पातील सदनिकाच्या सोडतीमध्ये अर्ज करण्यापासून सदनिकेचा ताबा मिळेपर्यंतच्या कार्यपद्धतीत मानवी हस्तक्षेप होऊ नये यासाठी इंटिग्रेडेट लॉटरी मॅनेजमेंट सिस्टीम (आयएलएमएस) 2.0 या नवीन प्रणालीद्वारे करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार पुणे मंडळांतर्गत सहा हजार ६८ सदनिकांची सोडत जाहीर करण्यात आली होती. परंतु अर्ज भरताना असणाऱ्या जाचक अटी, कागदपत्रांची पूर्तता, त्यानंतर प्रमाणिकरणासाठी लागणार वेळ, रहिवाशी प्रमणपत्रबाबत आलेल्या मुख्य अडचणींबाबत वारंवार नागरिकांच्या तक्रारी येत असताना जाचक अटी कायम ठेवल्या. परिणामी यंदाच्या सोडतीत सर्वात कमी अर्ज म्हाडाला प्राप्त झाले.

 

कोरोना वाढतोय, घाबरु नका पण काळजी घ्या ! राज्य शासनाने सतर्क राहण्याचे केले आवाहन

 

लॉटरीच्या निकाल लावताना प्रणालीत पुन्हा तांत्रिक बिघाड झाल्याने निकाल लांबविण्यात आला. स्वप्नातल्या घराच्या प्रतिक्षा वाढत असताना २० मार्च रोजी निकाल लॉटरीचा ऑनलाईन निकाल जाहीर करण्यात आले. मात्र अद्याप विजेत्यांची यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली नाही. तसेच काही विजेत्यांचे मोबाईलवर एसएमएस पाठविण्यात आले असताना प्रणालीतील अडचणींमुळे सदनिका रद्द झाल्या आहेत. अशा अनेक अडचणी निर्माण होत असून, नक्की विजेते कोण ? स्वप्नातले घर आपले की दुसऱ्या कोणाचे असा गोंधळ निर्माण झाला असून इच्छुकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. (Pune MHADA got a house in online lottery, but the list of winners is not published!)

 

 

 

गोंधळाचे वातावरण

    नेहमीप्रमाणे निकाल जाहीर झाल्यानंतर सायंकाळपर्यंत विजेते, प्रतिक्षा यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येत होती. परंतु नवीन प्रणालीद्वारे निकाल जाहीर करून आठवडा झाला तरी अद्याप कुठलीच यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली नाही. त्यामुळे जय उमेदवारांनी अर्ज भरले आहेत, त्यांच्यामध्ये गोंधळाचे वातावरण झाले आहे. (Pune MHADA got a house in online lottery, but the list of winners is not published!)

  •  लॉटरीच्या समस्या आणि अपेक्षित रकमेवर विकासकांचे नुकसान
  • विजेत्याने ऑनलाईन सदनिका स्वीकारण्याचा प्रयत्न करताच आपोआप रद्द होणे.
  • कागदपत्रे संगणकीकृत केले असतानाही अद्याप काही पडताळणीसाठी प्रलंबित.
  • आरक्षण श्रेणीतील अर्जदार प्रमाणपत्र सादर करू शकत नसल्याने, सहमतीसाठी पुन्हा म्हाडाच्या कार्यालयात जाऊन प्रक्रिया करावी लागणार.
  • विजेत्यांव्यतिरिक्त इतरांनी भरलेल्या अर्जांचे पैसे अद्याप पुन्हा बँकेत वर्ग करण्यात आले नसल्याने प्रतिक्षा.
Local ad 1