(Pune lashkar police) सोसायाट्यांतील जेष्ठांच्या मदतीला धावुन आले लष्कर पोलिस
पुणे : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यसाठी लाॅकडाऊन लावण्यात आले. त्यामुळे अनेकजण आहेत, त्याठिकाणी अडकून पडले. जेष्ठ नागरिकांना बाहेरही येतायेत नाही. त्यांचे नातेवाईही परदेशात किंवा इतर शहरांमध्ये आहेत. त्याबरोबरच अनेक विद्यार्थ्यीही एकटेच असल्याची माहिती समोर आली. ज्येष्ठ नागरीक व विद्यार्थ्यांना जीवनावश्यक वस्तू , औषधे व इतर प्रकारची मतद लष्कर पोलिसांच्या वतीने केली जाणार आहे. (Pune lashkar police)
लष्कर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम यांनी जेे एकटे रहात आहेत, त्यांना आवश्यक ती मदत करण्याची संकल्पना मांडली. पुणे लष्कर भागात सुमारे 40 मोठ्या सोसाट्या आहेत. विशेष पोलीस अधिकारी (SPO) यांच्या माध्यमातून प्रत्येक सोसाटीमध्ये जाऊन संवाद साधण्यात आला. त्यामध्ये लाॅकडाऊन असल्याने अनेकांना खोरदीसाठी बाहेर पडता येत नाही. तसेच अनेक विद्यार्थ्यी एकटेच वास्तव्य करत असल्याचे समोर आले. (Pune lashkar police)