Pune lalit patil drug case । अमंली पदार्थ तस्कर ललित पाटील प्रकरणात बडतर्फ पोलिस पुन्हा सेवेत 

Pune lalit patil drug case । पुणे : अमंली पदार्थ तस्कर ललित पाटील प्रकरणात (Pune lalit patil drug case)  बडतर्फ करण्यात आलेल्या महिला पोलीस उपनिरीक्षकासह पाच जणांना पुन्हा सेवेत घेण्यात आले आहे. संबंधित कर्मचाऱ्यांनी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, मुंबई येथे धाव घेतली होती. न्यायाधिकरणाने दिलेल्या निर्णयानुसार संबंधितांना पुन्हा सेवेत घेण्यात आले आहे. (Dismissed police in drug trafficker Lalit Patil case back in service)

 

पुण्यातील ससून रुग्णालयत्तून अमली पदार्थ तस्करी करणारा ललित पाटील पोलिसांचा बंदोबस्त असताना पळून गेला. पोलिसांनी कर्तव्यात कसूर केल्याने पाटीलला पळून जाण्यास मदत झाल्याच्या आरोपावरून पोलीस उपनिरीक्षक मोहिनी अविनाश डोंगरे (Sub-Inspector of Police Mohini Avinash Dongre), पोलीस हवालदार रमेश जनार्दन काळे ,नाथाराम भारत काळे, दिगंबर विजय चंदनशिव आणि अमित सुरेश जाधव यांना पोलीस दलातून बडतर्फ करण्यात आलं होतं. त्यानंतर संबंधित अधिकारी, कर्मचारी यांनी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण येथे धाव घेतली. सुनावणीअखेर त्यांना पुन्हा सेवेत पुनर्स्थापित करण्याबाबत आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार त्यांना पुन्हा एकदा पुणे पोलीस दलाच्या आस्थापनेवर घेण्यात आले आहे. दरम्यान, पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी नियंत्रण कक्ष आणि पोलीस मुख्यालय या ठिकाणी त्यांची नव्याने नियुक्ती करण्याचे आदेश दिले आहेत.

 

Local ad 1