...

Pune Election News 2024 । हजर होण्यास टाळाटाळ करणाऱ्या बीएलओंवर गुन्हे दाखल करण्याचा इशारा

Pune Election News 2024 । पुणे : निवडणूक प्रक्रियेत मतदान नाव नोंदणी अधिकारी (Voter Name Registration Officer बीएलओ) हा महत्वाचा असतो. मात्र, हे काम अनेकांना नको असते. त्यामुळे कोणी स्वतःच किंवा कुटुंबियांचे अजारपण समोर करुन आदेश रद्द करुन घेण्याचा प्रयत्न करतात तर काही जण रुजू होण्याचे टाळतात. विशेष म्हणजे हे काम मुळ पदाचे काम करुन करायचे असते. मात्र, आदेश निघूनही रुजू होण्यास टाळाटाळ करत आहेत. हे अधिकारी आता 24 तासांच्या आत  हजर न झाल्यास त्यांच्यावर थेट गुन्हे दाखल करा, असे आदेश पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव (Pune Divisional Commissioner Saurabh Rao) यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. 

 

 

पुणे विभागाचे मतदार यादी निरीक्षक (Electoral Roll Observer) असलेले विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी पुणे जिल्ह्याचा निवडणूक कामकाजाचा नुकताच आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीला उपजिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर यांच्यासह जिल्ह्यातील मतदार नोंदणी अधिकारी उपस्थित होते.

 

जिल्ह्यात मतदान केंद्रांची फेररचना करण्यात आली असून त्यात मतदान केद्रांची संख्या वाढली आहे. तर अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर पुन्हा मतदारांची संख्या वाढेल. त्यानुसार मतदान केंद्र निश्चित केले जाणार आहेत. प्रत्येक मतदान केद्रासाठी एक बीएलओ नियुक्त केला जातो. त्यासाठी सर्व शासकीय कार्यालयातील अधिकार्‍यांचा समावेश केला जातो. (Refusal to appear File cases against 542 BLO)

 

जिल्ह्यात सध्य स्थितीला 8 हजार 213 केंद्रावर बीएलओ नियुक्त करण्यात आले असून, यातील 542 अधिकारी निवडणूक कामासाठी रूजू होण्यास टाळाटाळ करत असल्याची बाब विभागीय आयुक्त राव यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली. त्यावर राव यांनी सबंधितांना 24 तासांच्या आत हजर होण्याच्या सूचना द्या. त्यानंतरही ते रूजू न झाल्यास त्यांच्यावर फौजदारी गुन्हे (Criminal offences) दाखल करा, अशा सक्त सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. त्यामुळे बीएलओ रूजू होतात की, त्यांच्यावर प्रशासन गुन्हे दाखल करतो, हे पहाणे महत्वाचे आहे.

 

 

Local ad 1