पुणे जिल्हा हा पर्यटनाचे हब म्हणून ओळखला जाईल – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी
पुणे श्रमिक पत्रकार संघाच्यावतीने आयोजित केलेल्या वार्तालापप्रसंगी जिल्हाधिकारी डुडी बुधवारी (ता. ९) बोलत होते. यावेळी पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनित भावे, सरचिणीस मिनाक्षी गुरव आदी उपस्थित होते. डुडी म्हणाले की, प्रशासनाने पर्यटन केंद्राचा आराखडा तयार केला आहे. त्यासाठी पर्यटन केंद्राच्या जागांची निवड केली जाणार असून तेथील स्थळांना प्रसिद्धी, तेथील मालाचे ब्रॅडिग, मार्केटिगसाठी मदत केली जाईल. परदेशातील अनेक देश पर्यटन केंद्रे म्हणून विकसित झाले आहेत. त्याप्रमाणे पुणे हे सुद्धा पर्यटन केंद्रे विकसित करण्यासाठी काम केले जाईल. तेथे आवश्यक त्या पूर्वपरवानग्या, सर्व सोईसुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. त्यासाठी नियमावली देण्यात येईल.
फाईल निकाली निघण्यासाठी तंत्रज्ञानाचा आधार
नागरिकांच्या तक्रारीच्या फाईल लवकर निकाली निघण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा आधार घेतला जात आहे. त्यासाठी सॉफ्टवेअर तयार केले आहे. त्यामुळे कोणती फाईल कधी आली आहे, किती दिवसापासून फाईल पेंडिग आहे, हे समजणार असून त्यावर लवकर काम करण्यासाठी आदेश दिले आहे. त्यावर सर्वजण काम करत आहे.
घनकचरा, पाण्याचा आराखडा तयार करण्याचे काम सुरू
जिल्हयात पुणे महानगरपालिका व जिल्हा परिषद एकत्र येऊन आराखडा तयार करण्याचे काम सुरू केले आहे. यामध्ये प्रामुख्याने घनकचरा, पाणी यांचा समावेश आहे. त्याचे नियंत्रण थेट मुख्यमंत्री यांच्याकडून केले जाणार आहे. येत्या काळात त्याचे चांगले परिणाम दिसून येतील. त्यासाठी नागरिकांनीही सहकार्य करणे अपेक्षित आहे. त्याबाबतच्या सूचना शासनाने दिलेल्या आहेत.