(Weekend lockdown cancelled) पुणे जिल्ह्यातील वीकेंड लॉकडाऊन रद्द
पुणे : पुणे शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णवाढीच्या संख्येत सातत्याने घट होत आहे. त्यामुळे आता पुणे महापालिका, पुणे ग्रामीण व सर्व नगरपालिका, कॅटोन्मेंट बोर्डातील शनिवार आणि रविवारी असलेले वीकेंड लॉकडाऊन रद्द (Pune District Weekend lockdown cancelled) करण्यात आला आहे.
या निर्मयामुळे आता अत्यावश्यक सेवेत सर्व दुकाने ही सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. वीकेंड लॉकडाऊन रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला तरी, इतर सर्व निर्बंध हे कायम राहणार आहेत. (Pune District Weekend lockdown cancelled)