पुणे जिल्ह्यात एकाच दिवसात दोन लाखांहून अधिक नागरिक झाले लसवंत

पुणे Pune vaccination news : कोरोनाची संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी कोरोना प्रतिबंध लसीकरण महत्त्वाचे आहे. मंगळवारी एका दिवसात पुणे, पिंपरी चिंचवड महापालिका आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागात २ लाख 34 हजार 260 डोस देण्यात आले आहेत. एका दिवसात सर्वाधिक लसीकरण केल्याची नोंद झाली आहे. (In Pune district, more than two lakh citizens were vaccinated against corona on the same day) 

 

जिल्हा परिषद पुणे, जिल्हा प्रशासन व बजाज समूह (Zilla Parishad Pune, Zilla Administration and Bajaj Group) यांच्या वतीने मंगळवारी ‘महालसीकरण’ मोहिम राबविण्यात आली.(In Pune district, more than two lakh citizens were vaccinated against corona on the same day) 

 

पुणे जिल्हा परिषदेने जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नागरीकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यासाठी ‘महालसीकरण’ मोहिम राबविण्यात आली. त्यात बजाज समूहाने सीएसआर निधीतून दीड लाख डोस उपलब्ध करुन दिले होते. यानुसार मंगळवारी सकाळपासून ग्रामीण भागातील परिचारीका आणि इतर सहकाऱ्यांनी अक्षरशः अविश्रांत काम करुन दोन लाख डोस देण्याचे उद्दिष्ट्य साध्य केले आहे. (In Pune district, more than two lakh citizens were vaccinated against corona on the same day) 

 

पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात एक लाख 68 हजार 515 डोस देण्यात आले आहेत. तर उर्वरित डोस पुणे व पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीत देण्यात आले आहेत. जिल्हा परिषदेकडून देण्यात आलेल्या आकडेवारीनुसार मंगळवारी जिल्ह्यातील विविध लसीकरण केंद्रांतून नागरीकांना  कोरोना प्रतिबंधक लसीचे २ लाख 34 हजार 260 डोस देण्यात आले आहे. (In Pune district, more than two lakh citizens were vaccinated against corona on the same day) 

Local ad 1