(Pune news) चौघींसोबत थाटला संसार, तब्बल 53 जणींना जाळ्यात ओढणारा दादला गजाआड
पुणे | शिक्षण बारावी नापास, रुबाब मात्र, सैन्य दलातील एखाद्या अधिकार्यासारखा. त्या जोरावरच त्याने चौघींसोबत वेगळे संसार थाटले. तर 53 तरुणींना जाळ्यात ओढणाऱ्या दादल्याला पोलिसांनी (Pune news) बेड्या ठेकल्या आहेत.
एका तरुणीने बिबवेवाडी पोलिस ठाण्यात फिर्र्याद दिली आहे. जानेवारी 2020 मध्ये आईच्या उपचारासाठी बिबवेवाडीतील एका हॉस्पिटलमध्ये आली होती. त्यावेळी पीएमपी बस स्थानकावर बसची वाट पाहत असताना आरोपी योगेशचे आधारकार्ड तरुणीला सापडले. त्यावेळी तिने आवाज देत योगेशला आधार कार्ड दिले. त्यानंतर त्याने फिर्यादी तरुणी आणि तिच्या आईसोबत ओळख वाढविली. लष्करामध्ये असल्याचे खोटे ओळखपत्र दाखवून तरुणीच्या आईचा विश्वास संपादित केला. त्यानंतर तरुणीसोबत खोटे लग्न करून तिच्या भावाला लष्करात भरती करण्यासाठी दोन लाख रुपये घेतले. त्यानंतर तरुणीच्या गावातील तरुणांचा विश्वास संपादित करून योगेशने आतापर्यंत 53 लाखांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. (Pune news)