जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांची मतमोजणी पूर्वी बदली करा ; प्राताधिकारी आणि सहाय्यक निवडणूक अधिकारी जोगेंद्र कट्यारे यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रारीने महसूल प्रशासनात खळबळ

पुणे : पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे (Suhas Divse) मतोमजणीच्या दोन दिवस अधीच वादात सापडले आहेत. सुहास दिवसे हे राजकीय प्रभावातून काम करत आहेत, त्यामुळे मतमोजणी पुर्वी त्यांची बदली करावी, अशी थेट मागणी खेडचे प्रांताधिकारी आणि सहाय्यक निवडणूक अधिकारी जोगेंद्र कट्यारे यांनी निवडणूक आयोगाकडे (Election Commission) केली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली असून, जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे खेड – आळंदीचे आमदार यांच्या प्रभावाखाली काम करत असल्याचा धक्कादायक आरोप केला आहे. (Pune Collector Suhas Diwase Faces Transfer Demand)

 

 

 

खेडचे प्रांताधिकारी आणि सहाय्यक निवडणूक अधिकारी जोगेंद्र कट्यारे म्हणाले, सुहास दिवसे हे खेड आळंदीचे आमदारांच्या प्रभावाखाली काम करत आहेत. सुहास दिवसे हे अनेक वर्षे कृषी आयुक्त, क्रिडा आयुक्त, पीएमआरडीए चे आयुक्त अशा विविध पदांवर काम करत पुण्यातच ठाण मांडून आहेत. त्यासाठी त्यांनी त्यांच्या राजकीय हितसंबंचा आधार घेतला आहे. सुहास दिवसे यांनी माझ्या कार्यकाळात झालेल्या जमिन अधिग्रहण प्रकरणांची यापुर्वीच चौकशी सुरू केलेली आहे, असे असताना 28 मे रोजी त्यांनी खेडच्या तहसील कार्यालयात पुन्हा छापा घातला.‌ सुहास दिवसे यांनी हे सर्व खेड आळंदीच्या आमदारांच्या प्रभावातून केले आहे.‌ सुहास दिवसे हे निवडणुकीच्या काळात सतत खेड आळंदीच्या आमदारांना भेटत होते. या आमदारांचा सुहास दिवसे यांना त्यांच्या प्रशासकीय सेवेच्या सुरुवातीपासून पाठिंबा राहिला आहे. आगामी विधानसभा निवडणुका स्वतंत्र वातावरणात पार पाडण्यासाठी सुहास दिवसे यांची बदली होणे आवश्यक आहे.

 

 

 

जोगेंद्र कट्यारे हे सध्या खेड-राजगुरूनगर प्रांताधिकारी आणि सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहत आहेत. 23 वर्षांच्या त्यांच्या कार्यकाळात त्यांनी 10 वर्षे नायब तहसीलदार, 8 वर्षे तहसीलदार, 5 वर्षे प्रांताधिकारी म्हणून सातारा, सांगली, नागपूर आणि पुणे जिल्ह्यात काम पाहिले आहे.

 

अजित पवार गटाच्या आमदाराचा प्रभाव

खेड आळंदीचे प्रांताधिकारी आणि सहाय्यक निवडणूक जोगेंद्र कट्यारे यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिले आहे. कट्यारे यांनी आमदारांचे थेट नाव घेतले नसले तरी खेड- आळंदीला आमदार अजित पवार गटाचे दिलीप मोहिते आहेत . त्यांच्या प्रभावातून सुहास दिवसे काम करत आहेत. तसेच सुहास दिवसे हे जाणीवपूर्वक आपल्याला त्रास देत आहेत. आमदार त्यांचे हितसंबध जोपसण्यासाठी दिवसे यांचा वापर करत आहे, असे कट्यारे म्हणाले.

 

Local ad 1