...

पुणे शहर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची मुंबईत बदली, पुणे आयुक्तपदी काणाची लागली वर्णी जाणून घ्या..

पुणे : पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (Amitabh Gupta) यांची मुंबईत कायदा व सुव्यवस्थाच्या अपर पोलीस महासंचालक पदी बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी सीआयडीचे अपर पोलीस महासंचालक रितेशकुमार (Ritesh Kumar) यांची पुणे शहर  पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. (Pune City Police Commissioner Amitabh Gupta transferred to Mumbai)

 

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तपदी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे अपर पोलीस महासंचालक विनयकुमार चौबे (Vinay Kumar Choubey) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे (Ankush Shinde) यांची नाशिक पोलीस आयुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे. पुण्यातील अपर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण यांची सीआयडीमध्ये पोलीस उपमहानिरीक्षक म्हणून बदली करण्यात आली आहे. (Pune City Police Commissioner Amitabh Gupta transferred to Mumbai)

मुंबई म्हाडा येथील मुख्य दक्षता अधिकारी व अपर पोलीस महासंचालक प्रशांत बुरडे यांची गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीआयडी) अपर पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मोटार परिवहन विभागाचे विशेष पोलीस महासंचालक सुनिल फुलारी यांची नाशिक परिक्षेत्र विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली केली आहे. (Pune City Police Commissioner Amitabh Gupta transferred to Mumbai)

Local ad 1