Pune Cantonment Book Distribution । पुणे कॅन्टोन्मेंट पुस्तक पतपेढी तर्फे विद्यार्थ्यांचा सन्मान

Pune Cantonment BookDistribution । पुणे : पुस्तकपेढीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याची संकल्पना प्रेरणादायी आहे.  समाजामध्ये भरीव काम करूनही व्यासपीठावर पाठीमागे किंवा प्रेक्षकांमध्ये बसतात. मात्र, सामाजिक काम न करता व्यासपीठावर पुढे बसण्याची काहींची धडपड सुरू असते, अशी खंत माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर (Former Minister of State Balasaheb Shivarkar) यांनी व्यक्त केली. (Pune Cantonment Book Distribution )

 

 

पुणे कॅन्टोन्मेंट पुस्तक पतपेढीच्या वतीने नेहरू मेमोरियल हॉलमध्ये (Nehru Memorial Hall) शालेय साहित्य वाटप (Distribution of school supplies) कार्यक्रमाचे आयोजन अॅड. अर्जुन खुर्पे (Adv. Arjun Khurpe) यांनी केले होते. याप्रसंगी अॅड. अशोकराव ताजणे, मनेश भाई शहा, दिलीप बुधानी, चंदा केदारी, किर्तीकुमार शहा, बापूसाहेब गानला, शाम सहानी (Adv. Ashokrao Tajne, Manesh Bhai Shah, Dilip Budhani, Chanda Kedari, Kirti Kumar Shah, Bapusaheb Ganla, Sham Sahani) आदी मान्यवर उपस्थित होते.

 

 

 

दरम्यान कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक गणेश घुले (Ganesh Ghule, Director of Agricultural Produce Market Committee) आणि टेक्सास गायकवाड यांनीही मनोगत व्यक्त केले.

यावेळी श्रीकांत खुर्पे, अॅड. आशिष खुर्पे, अॅड. विशाल खुर्पे, अॅड. अर्जुन खुर्पे, उषा माळी, प्रतिक लोंढे, अशोक घाडगे यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष प्रयत्न केले.

Local ad 1