पुणे कँटोन्मेंटच्या वार्ड 6 मधून गीता राघवाचारी यांनी फुंकले निवडणुकीचे रणशिंग

पुणे लष्कर : पुणे कँटोन्मेंटची पुढीलवर्षी (2022) बोर्डाची निवडणूक (Pune cantonment board elections) जाहीर होण्याची शक्यता आहे. वार्ड सहा मधून गीता राघवाचारी यांनी निवडणूक लढविण्याचा निर्धार केला आहे. गीता यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप (pune ncp president prashant jagtap) यांनी शुभेच्छा दिल्या.

वार्ड क्रमांक ६ मध्ये वास्तव्यास असलेल्या गीता राघवाचारी. (गोविंद स्वामी) यांचा दिनांक 18 नोव्हेंबर रोजी वाढदिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात गीता यांच्याकडे महिला अध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविण्यात आली. यावेळी प्रशांत जगताप यांनी नियुक्तीचे पत्र दिले. यावेळी वनराज आंदेकर (नगरसेवक पुणे म.न.पा), मीनाताई पवार.(पु.कॅ.वि.म.संघ.महिला अध्यक्षा.), आनंद सवाने (पु.कॅ.वि.म.संघ अध्यक्ष) उपस्थितीत होते. (Pune cantonment board elections)

पटेल रुग्णालयात सायबेज आशा ट्रस्ट उभारणार शस्त्रक्रियागृह

 

यावेळी कॅन्टोन्मेंट मतदार संघातील आजी-माजी पदाधिकारी, कार्यकर्ते,वार्ड क्र.६ मधील मतदार बंधू-भगिनी आणि सर्व पक्षीय मित्रपरिवार कार्यक्रमात उपस्थित होते.

शेतकरी विरोधी कायदे मागे घेण्याची घोषणा !

 

पुणे आणि मुंबईतील नामवंत पार्श्व गायकड कलाकारांचा ऑर्केस्ट्राचे आयोजन करण्यात आले होते. संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन जयकुमार एम. राघवाचारी (पुणे कॅन्टोन्मेंट ब्लॉक अध्यक्ष) यांनी केले.(Pune cantonment board elections)

Local ad 1