...

(pune cantonment board) पुणे कॅन्टोन्मेंटमध्ये लसीकरणातील राजकीय हस्तक्षेप थांबवा

पुणे ः  पुणे कॅन्टोन्मेंट भागातील लसीकरणात होणारा राजकीय हस्तक्षेप होत आहे. तो थांबवावा, लसीकरण केंद्रांवर पोलिस सुरक्षा द्यावी, लसीकरणाची पुर्व नोंदणी ऑनलाईन करा, अशा विविध मागण्या  सामाजिक कार्यकर्त्यांनी पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्यकार्यकारी अधिकारी अमित कुमार यांच्याकडे निवेदनाद्वारे केल्या आहेत. (pune cantonment board covid vaccination centre)

लसीकरणाती विविध समस्यांविषयी शिष्ठमंडळाने  मुख्यकार्यकारी अधिकारी अमित कुमार यांची भेट घेतली. त्यामध्ये शहर काँग्रेसचे सरचिटणीस संजय कवडे, कर्तव्य फाउंडेशनचे अध्यक्ष विकास भांबुरे, राष्ट्रवादीचे कॅन्टोन्मेंट कार्याध्यक्ष निलेश कणसे, राजे प्रतिष्ठानचे अध्यक्ष शिरीष आगुरेड्डी व हिंदवी स्वराज्य संघाचे मोहन नारायणे यांचा समावेश होता. (pune cantonment board covid vaccination centre)


 

  कॅन्टोन्मेंट बोर्डातील नागरिकांना सरदार वल्लभ भाई पटेल रुग्णालयातच लसीकरण केले जात होते. त्यामुळे नागरिकांचे लसीकरण लवकरच होण्यासाठी केंद्र वाढविण्याची मागणी सामाजिक संघटना व  काही राजकीय पक्षांनी केली होती. त्यानंतर  तीन ठिकाणी नवीन लसीकरण केंद्र सुरु करण्यात आले. मात्र, काही राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांचा  लसीकरण केंद्रांवर हस्तक्षेप वाढला आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना लसीकरणासाठी अडचणी होत आहेत, होोत असलेल्या हस्तक्षेपावर आवर घालावा, नवीन केंद्रे ऑनलाईन करावित, प्रत्येक केंद्रावर पोलीस संरक्षण घ्यावे ,नागरिकांना उपलब्ध लसींची पूर्व सूचना द्यावी, आदी मगण्या शिष्टमंडळाने निवेनदनाद्वारे केल्या आहेत. (pune cantonment board covid vaccination centre)

Local ad 1