...

Pune Cantonment Assembly Constituency। पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघावर आरपीआय आठवले गटाने केला दावा

Pune Cantonment Assembly Constituency पुणे : राज्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू शकते. महायुतीमध्ये महत्वाचा घटक पक्ष असलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाने राज्यातील 288 पैकी  १० ते १२ जागांवर आपला दावा केला आहे. त्यामध्ये पुण्यातील पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचा समावेश असून, हा मतदारसंघ रिपाइंसाठी सोडावा, अशी मागणी रिपाइंचे राज्य संघटक परशुराम वाडेकर (Parashuram Wadekar, state convenor of RIP) यांनी केली आहे. दरम्यान, पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार सुनील कांबळे (MLA Sunil Kamble) भाजपचे आहेत. त्यामुळे या जागेवरुन ताणव निर्माण होण्याची शक्यता आहे. (Pune Cantonment Assembly Constituency was claimed by RPI Athavale group)

 

पुणे जिल्ह्यातील 900 पेट्रोलियम विक्रेते, वाहतूकदार आंदोलनावर ठाम ; जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांसोबत झाली बैठक

परशुराम वाडेकर म्हणाले, केंद्रीय सामाजिक व न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Union Minister of State for Social Affairs and Justice Ramdas Athawale) यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या कार्यकर्त्याची फळी मजबूत आहे. आपल्याला सत्ता मिळवायची असेल तर काहीतरी तडजोड करणे आवश्यक आहे, या विचारातून आंबेडकरी चळवळीच्या विचारधारेच्या विरोधी असलेल्या राजकीय पक्षांशी युती करण्याचे धैर्य रामदास आठवले यानी दाखवले. या निर्णयाचा फायदा चळवळीतील नेते, कार्यकर्त्यांना कमी आणि भाजपला अधिक होत असल्याचे गेल्या १५ वर्षात दिसून आले.  यामुळे आंबेडकरी समाजात नाराजीचे वातावरण आहे. आमच्या पक्षाला लोकसभेला संधी नाही मिळाली, आता विधानसभा निवडणूकीत किमान १२ जागा मिळाव्यात ही पक्षाची भाजपकडे मागणी आहे. (Pune Cantonment Assembly Constituency was claimed by RPI Athavale group)

Bigg Boss winner Suraj Chavan । बिग बॉस विजेता सूरज चव्हाणला अजित पवारांनी विचारले प्रश्न आणि उत्तरावर खळखळून हसले  

पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव असून, यामध्ये आंबेडकरी समाजाची मते निर्णायक आहेत, यामुळे इथे आम्हाला संधी मिळायला हवी. मी आजपर्यंत तीन वेळा विधानसभा निवडणूक लढली आहे. त्यामध्ये कॅन्टोन्मेंट मतदार संघ आहे. या तीनही वेळेला तिसऱ्या क्रमांकाची मते मिळविली आहेत, या ठिकाणाहून निवडणूक लढण्यास इच्छुक असल्याचे जाहीर केले.
         भाजपने आंबेडकरी चळवळीतून आलेल्या रिपाईच्या कार्यकर्त्याला उमेदवारी दिली तर महायुतीला पुणे जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर फायदा होईल, असेही वाडेकर यांनी नमूद केले. गेली १५ वर्षे मध्ये भाजपाने महायुतीमधून एकही जागा रिपाईला दिली नाही यामुळे अगोदरच मोठी नाराजगी आहे जर या वेळेस संधी न मिळाल्यास याचा परिणाम निवडणुकीमध्ये झाल्याशिवाय राहणार नाही यामुळे आम्हाला सन्मानपूर्वक जागा देऊन आंबेडकरी समाजाच्या नाराजगी दूर करावी असे पत्र राज्य संघटन सचिव परशुराम वाडेकर यांनी प्रसिद्ध दिले आहे.
Local ad 1