पुणे : नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मद्याचे प्याले रिचवले जातात. त्यासाठी गोवा राज्यात निर्मित दारूचा वापर बेकायदा विक्री केली जातो. त्यावर उत्पादन शुल्क विभागाची नजर असून, पुणे उत्पादन शुल्क विभागाणे तब्बल पावणे दोन कोटींचा मद्यसाठा जप्त केला आहे. (Pune Breaking News : Goa State Manufactured Liquor Stock of Two Crores Seized in Pune)
थर्टी फर्स्ट सेलिब्रेशनच्या तोंडावर राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठी कारवाई केली आहे. सुमारे १ कोटी ७० लाख रुपयाची विदेशी दारू जप्त करण्यात आली आहे. या कारवाईत 2 ट्रक आणि तब्बल 2 हजारांहून अधिक दारूचे बॉक्स जप्त केले असून, 7 जणांना अटक केली आहे. (Pune Breaking News : Goa State Manufactured Liquor Stock of Two Crores Seized in Pune)
नववर्षाच्या पूर्व सध्येला उत्पादन शुल्क विभागाने मोठी कामगिरी केली आहे. गोवा बनावटीच्या मद्यासह महाराष्ट्र, राजस्थान आणि गुजरात राज्यातील 7 आरोपींना ताब्यात घेतले असून, त्यांना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती पुणे जिल्हा उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक चरणसिंह राजपूत यांनी दिली. (Pune Breaking News : Goa State Manufactured Liquor Stock of Two Crores Seized in Pune)
ट्रकमध्ये पसरवल्या डांबराच्या गोळ्या
पोलिसांना या प्रकाराचा संशय येऊ नये म्हणून आरोपींनी शक्कल लढवली होती. त्यांनी ट्रकभर डांबराच्या गोळ्या पसरवून ठेवल्या होत्या. मद्य साठ्यातील एखादी बॉटल फुटली किंवा लिक झाली तर वास येण्याची शक्यता असते त्यामुळे आरोपींनी संशय येऊ नये म्हणून त्यांनी हे कृत्य केलं होतं. मात्र राज्य उत्पादन शुल्क विभागाने शिताफीने कारवाई केली आहे.
पोलिसांची करडी नजर
दरम्यान, नवीन वर्षांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची पुण्यात करडी नजर आहे. अवैध दारु विक्री आणि जुगार अड्ड्यांवर पोलिसांनी लक्ष केंद्रीत केले असून, पुण्यात गोव्यातून मोठ्या प्रमाणात दारु विक्रीसाठी आणली जाते. त्यांच्यावर कारवाई देखील केली जाते. 31 डिसेंबरच्या तयारीसाठी अनेक माफिया पूर्वतयारीत असतात. या काळात अवैध मद्यविक्री देखील जोरदार केली जाते. त्यांच्यासोबतच अमली पदार्थांची देखील मोठ्या प्रमाणात विक्री केली जाते.