Pune Book Festival । साहित्याची भूक भागविणारा अप्पा बळवंत चौक ही वाचणार पुस्तक

अप्पा बळवंत चौकात ११ डिसेंबरला शांतता पुणेकर वाचत आहेत, उपक्रमाचे आयोजन

Pune Book Festivalपुणे. गेल्या कित्येक वर्षांपासून पुण्यनगरीतील वाचकांची साहित्य रुपी भूक भागविणाऱ्या अप्पा बळवंत चौकात ‘शांतता… पुणेकर वाचत आहेत’ या उपक्रमाचे मोठ्या उत्साहात आयोजन करण्यात येणार आहे. वर्तमानपत्रांचे वितरण असो की पाठ्यपुस्तकांपासून कथा-कांदबऱ्यांची विक्री, सर्व प्रकारचे साहित्याची बाजारपेठ असलेला अप्पा बळवंत चौकही (Appa Balwant Chowk)  एका अर्थाने या वाचन उपक्रमात सहभागी होणार आहे. (Pune Book Festival Keep Calm On wednesday punekar is reading)

 

राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या (NBT) वतीने येत्या १४ ते २२ डिसेंबर या कालावधीत फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर पुणे पुस्तक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाची जय्यत तयारी सुरू असून, त्या अनुषंगाने विविध सार्वजनिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे हा महोत्सव पुणेकरांचा असल्याने पुणेकर नागरिक मोठ्या प्रमाणावर या महोत्सवातत सहभागी होणार आहे. त्यांचा सहभाग अधिक वाढावा यासाठी उद्या बुधवारी ११ डिसेंबरला ‘ शांतता…पुणेकर वाचत आहे’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत उद्या बुधवारी ११ डिसेंबरला दुपारी १२ ते १ या कालावधीत अप्पा बळवंत चौक परिसरात ‘शांतता… पुणेकर वाचत आहे’ हा उपक्रम पार पडणार आहे.

 

पुणे पुस्तक महोत्सव विश्वविख्यात होईल – आमदार चंद्रकांत पाटील

या उपक्रमात अप्पा बळवंत चौकातील पुस्तक विक्रेते, वर्तमानपत्र विक्रेते, विद्यार्थी सहभागी होणार आहेत. यासह शहरातील साहित्यिक, कवी, लेखक, ज्येष्ठ पत्रकारांचाही या उपक्रमात सक्रिय सहभाग असणार आहे. या उपक्रमाच्या निमित्ताने अप्पा बळवंत चौकात सुशोभीकरण करण्यात येणार आहे. वाचकांच्या सोयीसाठी ठिकठिकाणी व्यवस्था उभी केली जाणार आहे. दरम्यान, लक्ष्मी रस्त्यावर याच दिवशी पादचारी दिन साजरा करण्यात येणार असून, अप्पा बळवंत चौकातही काही ठराविक वेळेपुरता पादचारी दिन साजरा करण्याबाबत प्रयत्न सुरू आहे. जेणे करून वाचकांना अधिक सोयीचे वातावरण उपलब्ध होईल.

  Pune Book Festival

लक्ष्मी रस्त्यावर प्रत्येक दुकानात पुस्तक

महापालिकेकडून लक्ष्मी रस्त्यावर पादचारी दिन साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्तामे रस्त्यावरील वाहतूक बंद ठेवली जाणार आहे. अधिकाधिक नागरिक या दिवशी रस्त्याने पायी फिरून खरेदीचा आनंद घेणार आहेत. यासह त्यांनी वाचनाचा आनंदही घेता येणार आहे. लक्ष्मी रस्त्यावर दुकानांमध्ये ग्राहकांना वाचण्यासाठी पुस्तके उपलब्ध करून दिली जाणार आहेत. 


Local ad 1