पुणे बंद : पुणे बंदला स्फुर्त प्रतिसाद
Pune : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari), मंत्री चंद्रकांत पाटील (Minister Chandrakant Patil), आमदार प्रसाद लाड (MLA Prasad Lad) तसेच इतर भाजप नेत्यांनी (BJP leaders) केल्लया वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्यांविरोधात निषेध म्हणून सामाजिक संघटना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना यांनी पुणे बंद पुकारला आहे. या बंदमध्ये व्यापारी संघटना, आडत व्यापाऱ्यांनी बंदला पाठिंबा दिला आहे या बंदसाठी उदयनराजे भोसले, संभाजीराजे छत्रपती, सुषमा अंधारे, सुप्रिया सुळे आणि इतरही अनेक नेत्यांना आमंत्रित करण्यात आलं आहे. डेक्कन येथून निघालेला मोर्चाचे लाल महालाजवळ जाऊन सभेत रुपांतर होणार आहे.
यात कोणताही उचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी सुमारे साडे सात हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला आहे. पुणे पोलिसांनी सुमारे 100 वरिष्ठ अधिकारी, 1000 हून अधिक पोलीस कर्मचारी तैनात केले आहेत. (Pune Bandh: Spontaneous response to Pune Bandh)
कोण आहे बंदमध्ये सहभागी
- पी एम पी एम एल ही सार्वजनिक वाहतूक बस सेवा बंद राहणार आहे. रिक्षा संघटनांनी पाठिंबा दिल्याने रिक्षा बंद राहणार आहेत.हॉटेल्स बंद राहणार आहेत. (Pune Bandh: Spontaneous response to Pune Bandh)