...

पुण्यात रिक्षा चालक रिक्षा बंद आंदोलनावर ठाम

Pune Auto Rickshaw Strike : पुण्यातील पंधरा रिक्षा (Rickshaw) चालक-मालक संघटनांकडून सोमवारी रिक्षा बंद आंदोलनाची (Pune Rickshaw Bandh Protest) हाक देण्यात आली आहे. यावर रिक्षा बंद ठेवू नका, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले होते. परंतु रिक्षाचालक संघटना आंदोलन करण्याच्या भूमिकेवर ठाम आहेत. (Pune Auto Rickshaw Strike) सोमवारी सकाळी अकरा वाजता आरटीओ कार्यालयासमोर चक्काजाम आंदोलन केले जाणार आहे.

 

 

रिक्षा चालक संघटनांनी यापूर्वीही बेकायदा बाईक टॅक्सी (Bike Taxi) विरोधात संघटनांनी आक्रमक पवित्रा घेत बंद पुकारला होता. परंतु प्रशासनाने कारवाईचे आश्वासन दिले होते. मात्र, कोणतीही कारवाई झालेली नाही. पुणे आणि पिंपरी-चिंचवड (Pune and Pimpri-Chinchwad) शहरातील बेकायदा बाईक टॅक्सी (Illegal bike taxis) विरोधात रिक्षा संघटना पुन्हा एकदा आक्रमक झाल्या असून, त्यांनी आंदोलनाची हाक दिली आहे.

 

 

बेकायदा बाईक टॅक्सी विरोधात ‘बघतोय रिक्षावाला संघटने’ने (Baghtoy Rickshawala Associatio) पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतला आहे. यापूर्वी 28 नोव्हेंबर रोजी ‘बघतोय रिक्षावाला संघटने’ने बेकायदा बाईक टॅक्सी विरोधात पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात बेमुदत संप पुकारला होता. त्यावेळी प्रशासनातील अधिकारी आणि पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या आश्वासनानंतर रिक्षा संघटनांनी हा संप स्थगित केला होता.

 

 

रिक्षाचालकांनो 12 डिसेंबरला आंदोलन करु नका, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. नागरिकांना होणारी असुविधा टाळण्यासाठी आणि पुणे (Pune) जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती कायम राखण्यासाठी रिक्षाचालकांनी करु नये, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख (Rajesh Deshmukh) यांनी केले आहे. तरीही संघटना आंदोलनाच्या भूमिकेवर कायम आहेत.

 

पुणे जिल्हा वाहतूक संघटनेचे संजय कवडे (Sanjay Kawade of Pune District Transport Association) म्हणाले, प्रशासनाने दिलेले अश्वासन पाळलेले नाही, त्यामुळे आम्हाला नाविलाजाने आंदोलन करावे लागत आहे. आतापर्यंत काय कारवाई केली, हे अधिकाऱ्यांनी सांगावे. प्रवाशांना वेठीस धरण्याचा आमचा कोणताही हेतू नाही. परंतु आम्ही आमच्या हक्कासाठी लढतोय, बेकायदा होणारी प्रवासी वाहतूक थांबवावी यासह अन्य मागण्या मान्य करावे, अशी मागणी कडवे यांनी केली आहे.
Local ad 1