pune acb trap। ट्रॅव्हल्स व्यवसायिकाकडून लाच घेणारे तीन पोलिस हवालदार एसीबीची जाळ्यात

येरवडा पोलिस ठाण्यात (Yerwada Police Station) कार्यरत होते

pune acb trap । पुणे : पुण्यातील येरवडा पोलिस ठाण्यात (Yerwada Police Station) कार्यरत असलेल्या तीन पोलिस हवालदारांनी तक्रारदाराच्या कारच्या अपघाताची तक्रार नोंदवून घेण्यासाठी 20 हजार रुपयांची लाच मागितली. तडजोडीनंतर 13 हजार रुपयांची लाच स्विकारताना पोलिस हवालदार राजेंद्र दीक्षित (Police Constable Rajendra Dixit) याला एसीबीच्या पथकाने अटक केली आहे. तर अन्य दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार ट्रॅव्हल्स व्यवसायिकाच्या कारचा अपघात झाला होता. त्याची तक्रार नोंदवून घेण्यासाठी येरवडा पोलिस ठाण्यात कर्तव्यावर असलेल्या पो हवा राजेंद्र दीक्षित, पो हवा जयराम सावलकर आणि पो हवा विनायक मुधोळकर (Rajendra Dixit, Jairam Savalkar,Vinayak Mudholkar) यांनी 20 हजार रुपयांची लाच मागितली. त्यात तडजोडीनंतर 13 हजार रुपयांवर डिल फायनल झाली. ही लाच स्विकारताना एसीबीच्या पथकाने पो हवा राजेंद्र दीक्षित याला अटक केली. तर पो हवा जयराम सावलकर आणि पो हवा विनायक मुधोळकरयांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Trap Case Report

➡ घटक :- पुणे ➡ तक्रारदार : पुरुष 24 वर्ष ➡ आरोपी लोकसेवक : 1.पो हवा राजेंद्र दीक्षित. (अटक) 2. पो हवा जयराम सावलकर, 3. पो हवा विनायक मुधोळकर. सर्व – येरवडा पोलीस स्टेशन,पुणे शहर. ➡ लाच मागणी :- सुरुवातीला 20,000/- तडजोडी अंती 13,000 हजार रुपये. ➡ लाच स्विकारली: 13,000/- रु. ➡️पडताळणी : दि. 12/06/2023 ➡️ सापळा दिनांक : 13/06/2023 ➡️ ठिकाण : येरवडा पोलीस स्टेशन परिसरात

काय आहे प्रकरण

तक्रारदार यांचा ट्रॅव्हल्सचा व्यवसाय असून, तक्रारदार त्यांच्या कारचा अपघात झाला होता. या अपघाताची तक्रार दाखल करण्यासाठी लोकसेवक पो हवा जयराम सावळकर, पो हवा विनायक मुधोळकर,पो हवा राजेंद्र दीक्षित यानी तक्रारदारांकडे 13,000/- रुपयांची लाच मागणी करून ती लाच रक्कम पो हवा राजेंद्र दीक्षित यांनी येरवडा पोलीस स्टेशन येथे स्वीकारल्यावर त्यांना रंगेहात ताब्यात घेण्यात आले.

 

  सापळा पथक 

पोलीस निरीक्षक- भारत साळुंखे (मो क्र +919923699430) पोलिस निरीक्षक- प्रवीण निंबाळकर ASI – मुकुंद आयाचीत पो शि – भूषण ठाकूर चालक पो शि – पांडुरंग माळी  यांचा समावेश होता.

 

मार्गदर्शन अधिकारी 

अमोल तांबे, पोलीस अधीक्षक ला प्र वि पुणे परिक्षेत्र.(मोबाईल क्र. 9922100712)

शीतल जानवे. अपर पोलीस अधीक्षक ला प्र वि पुणे(मोबा क्र.9921810357)

 

Local ad 1