पुणे : आरोग्य विभागातून निवृत्त झालेल्या मुकादमाच्या शिल्लक अर्जित रजेचा धनादेश देण्यासाठी एक लाख रुपयांची लाच स्वीकारणार्या महापालिकेतील बिगारी कामगार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) सापळ्यात अडकला. या कारवाईमुळे महापालिका प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे. (Pune Acb News. ACB trap in Pune Municipal Corporation)
तक्रारदार हे महापालिकेच्या आरोग्य विभागातील मुकादम पदावरून 2022 मध्ये सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांच्या शिल्लक अर्जित रजेच्या रोखीकरणाचा धनादेश देण्यासाठी पासलकर याने एक लाख रुपयांची लाच मागितली. परंतु तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी एसीबीकडे तक्रार केली होती. या प्रकरणात एसीबीने तक्रारीची पडताळणी करुन महापालिकेच्या आवारात सापळा लावला. त्या सापळ्यात पासलकर लाच घेताना अलगत अडकला.