सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण कोरोना पाॅझिटिव्ह

नांदेड ः राज्याचे सार्वजनिक बांधाकम तथा नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांची कोरोना चाचणी पाॅझिटिव्ह आली आहे. याची माहिती अशोक चव्हाण यांनी ही माहिती स्वःता ट्विट करुन दिली आहे. (Public Works Minister Ashok Corona Positive)

 

 

सध्या कोरोनाची तिसरी लाट सुरु असून, नांदेडसह राज्यात कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. हिवाळी आधिवेश झाल्यानंतर राज्यातील अनेक मंत्री आणि आमदार कोरोना बाधित झाले होते. आता राज्याचे सर्वजनिक बांधकाम तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांचीही कोरोना चाचणी पाॅझिटिव्ह आली आहे. त्यासंदर्भातील माहिती अशोक चव्हाण यांनी स्वःता दिली आहे. माझी कोरोना चाचणी पाॅझिटिव्ह आली आहे. संपर्कात आलेल्याांनी कृपया काळजी घ्यावी, असे आवाहन चव्हाण यांनी केले आहे.
(Public Works Minister Ashok Corona Positive)

Local ad 1