Public Health Department 2021 पुणे : राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागात ५२ पदांअंतर्गत एकूण २ हजार ७२५ रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. त्यासाठी पुढील महिन्यात परीक्षा होणार असून, अभ्यासक्रम कसा असणार आहे. त्यासाठी सर्व 52 पदांसाठी कसा असणार आहे अभ्यासक्रम हे बातमीत लिंक देण्यात आली आहे.
अभ्यासक्रम
आरोग्य सेवा आयुक्तालयाअंतर्गत येणाऱ्या सार्वजनिक आरोग्य विभागात विविध पदांची भरती केली जात आहे. यात एकूण २ हजार ७२५ जागा भरल्या जात आहेत. यासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवण्यात आले. या पदासाठी शैक्षणिक पात्रता आणि पगार हा पदांनुसार वेगळा असणार आहे. ( Health Department 2021)
या विभागातील पदांची भरती?
सार्वजनिक आरोग्य विभागात (गट-क) अंतर्गत एकूण ५२ पदाच्या एकूण २७२५ जागा भरण्यात येणार आहेत. भंडार नि वस्त्रापाल, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी, ग्रंथपाल, प्रयोगशाळा सहाय्यक, एक्सरे तंत्रज्ञ, रक्तपेढी तंत्रज्ञ, औषध निर्माण अधिकारी, आहार तज्ञ, ईसीजी तंत्रज्ञ, दंत यांत्रिकी, डायलिसिस तंत्रज्ञ, दूरध्वनीचालक, वाहनचालक, शिंपी, नळकारागीर, सुतार, नेत्र चिकित्सा अधिकारी, मनोविकृती सामाजिक कार्यकर्ता, भौतिकोपचार तज्ञ, व्यवसोपचार तज्ञ, वार्डन, कनिष्ठ लिपिक, दंत आरोग्यगक, सेवा अभियंता, वरिष्ठ सुरक्षा सहायक,वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता, पेशी तज्ञ, ग्रंथपाल आणि इतर पदांच्या रिक्त जागांचा समावेश आहे. (Public Health Department 2021)