...

नांदेड जिल्ह्यात आजपासून जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू

नांदेड : नांदेड जिल्ह्यात (Nanded District) शनिवार 10 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 6 वाजेपासून ते शनिवार 24 डिसेंबर 2022 च्या मध्यरात्री पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहणार आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे.  (Prohibition of assembly, prohibition of arms orders in force in the district)

 

 

जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी (Additional District Magistrate) यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये (Under Section 37 (1) and (3) of the Bombay Police Act, 1951) जिल्ह्यात 10 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 6 वाजेपासून ते 24 डिसेंबर 2022 रोजी मध्यरात्रीपर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू (Ban on Arms and Prohibition of Demonstrations) राहील. (Prohibition of assembly, prohibition of arms orders in force in the district)

 

 

त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमुद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश कामावरील पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अत्यंयात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही. (Prohibition of assembly, prohibition of arms orders in force in the district)

 

 

अशा मिरवणुकांना परवानगी देण्याचे अधिकार तसेच पाच व पाचपेक्षा जास्त इसम जमण्यासाठी, सभा, मिरवणुका, मोर्चा काढणे, ध्वनीक्षेपक वाजविण्यास परवानगी देण्याचे अधिकार जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना तसेच पोलीस अधीक्षक नांदेड यांनी प्राधिकृत केलेल्या इतर पोलीस अधिकारी यांना राहतील. (Prohibition of assembly, prohibition of arms orders in force in the district)
Local ad 1