(Procession banned in Pune district) पुणे जिल्ह्यात मिरवणूकीला बंदी
पुणे : पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख यांनी पुणे ग्रामीण जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी दिनांक 27 मार्च 2021 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 36 अनुसार पुणे ग्रामीण जिल्ह्यातील सर्व पोलीस अधिकाऱ्यांना खालील प्रमाणे अधिकार प्रदान केले आहेत. (Procession banned in Pune district)
यामध्ये, रस्त्याने जाणाऱ्या मिरवणुकीतील किंवा जमावातील लोकांनी कशाप्रकारे चालावे त्यानी वर्तणूक किंवा वागणूक कशी ठेवावी. अशा कोणत्याही मिरवणूक या कोणत्या मार्गाने ,कोणत्या वेळात काढाव्यात किंवा काढू नयेत असे मार्ग व अशा वेळा विहित करणे. (Procession banned in Pune district)
सार्वजनिक ठिकाणी अगर सार्वजनिक करमणूकीच्या कार्यक्रमाच्या वेळी वापरण्यात येणाऱ्या लाऊडस्पिकरची वेळ, पध्दती, ध्वनी तीव्रता,आवाजाची दिशा यांचे नियंत्रण करणे. सक्षम अधिकाऱ्यांनी या अधिनियमांची कलमे 33,35,37 ते 40,42,43, व 45 या अन्वये दिलेल्या कोणत्याही आदेशास अधीन असलेले व त्यास पुष्टी देणारे योग्य आदेश देणे. (Procession banned in Pune district)