...

महायुतिच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदींची नांदेडमध्ये  होणार सभा

नांदेड : विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात विविध ठिकाणी सभा घेणार आहेत. दिनांक 9 नोव्हेंबर रोजी नांदेड आणि अकोला (Nanded, Akola) येथे त्यांची जाहीर सभा होणार आहे. त्याचे नियोजन केले जात आहे. (Prime Minister Narendra Modi’s meeting in Nanded for grand alliance candidates)

 

How To Lock-Unlock Aadhaar Card Process In Marathi।आधार कार्ड लॉक-अनलॉक कसे कराल ? पाहा स्टेप बाय स्टेप प्रोसेस

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराच्या रणधुमाळीत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या दहा सभा होणार आहेत. राज्याच्या प्रत्येक विभागात दोन अशा एकूण दहा प्रचारसभा पंतप्रधान मोदी घेणार आहेत. एकावेळी किमान १५ ते २० उमेदवारांच्या प्रचारासाठी या सभांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (BJP state president Chandrasekhar Bawankule) यांनी येथे दिली.

 

PICT माजी विद्यार्थी अतिंद्रिय सान्याल यांचा “AI Impact 50” यादीत समावेश

 

८ नोव्हेंबर रोजी धुळेनंदुरबार, ९ नोव्हेंबर : अकोलानांदेड येथे सभा होणार आहे. १२ नोव्हेंबर : चंद्रपूरचिमूर, सोलापूर आणि पुणे, १४ नोव्हेंबर : संभाजी नगरमुंबई अशा सभा आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभांमुळे निश्चितपणे नांदेड सह राज्यातील महायुतीला मोठा फायदा होईल असा अंदाज वर्तविला जात आहे.

 

आर्थिक व्यवहाराच्या नियमांत आजपासून  बदलले ; सर्व सामान्यांच्या खिशावर काय होणार परिणाम जाणून घ्या

 

नांदेडच्या सभेकडे लक्ष

नांदेड उत्तर आणि दक्षिण विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार असले तरी भारतीय जनता पार्टीचा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात नाही. दक्षिण मध्ये मात्र, भाजपने बंडखोरी केली आहे. दिलीप कंदकुर्ते यांनी पुन्हा एकदा अपक्ष फॉर्म भरल्याने महायुती समोर बंडखोरायाची कडवे आव्हान आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेचा बंडोखराला फायदा होणार का महायुतीच्या उमेदवाराला होणार हे निवडणूक निकालानंतर स्पष्ट होईल.

Local ad 1