पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मतदारांचे मानले आभार, काय म्हणाले ते जाणून घ्या…

नवी दिल्ली : गुजरात विधानसभा आणि हिमाचलप्रदेश विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाले. (Gujarat Election Results) त्यात गुजरात भाजपने राखले असून, त्यांच्या हतातून हिमाचल प्रदेश गेले आहे. काँग्रेसने हिमाचल प्रदेशमध्ये सत्तेत पुनरागमन केलं आहे. गुजरातमधील भाजपच्या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी मतदारांचे आभार मानले आहेत. (Prime Minister Narendra Modi thanked the voters)

 

 

दिल्ली येथील भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी येऊन त्यांनी उपस्थितांशी संवाद साधत आभार मानले. पंतप्रधान मोदी म्हणाले, हिमाचल प्रदेशात (Himachal Pradesh) दर निवडणुकीत सत्तांतराची परंपरा आहे. मात्र, आजपर्यंत कधीही पराभूत पक्षाचा केवळ एक टक्का मतांच्या फरकाने पराभव झाला नव्हता. जरी हिमाचलमध्ये पराभव झाला असला तरी तेथील विकासासाठी शतप्रतिशत काम करू असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी दिले. (Prime Minister Narendra Modi thanked the voters)

 

 

कोरोना महामारी नंतर बिहारमध्ये निवडणूक झाली. त्या निवडणुकीत भाजपला जनतेने भरभरून मते दिली. त्यानंतर मणिपूर, गोवा, उत्तर प्रदेशमध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये भाजपला पाठिंबा दिला. जेव्हा देशासमोर आव्हान उभे राहाते तेव्हा जनता भाजपच्या पाठिशी उभी असते, असे नरेंद्र मोदी म्हणाले. (Prime Minister Narendra Modi thanked the voters)

 

 

तरुणवर्ग तेव्हाच मतदान करतो, जेव्हा त्याला विश्वास असतो. तरुणांनी भाजपला मतदान केले. त्याचा भाजपवर विश्वास निर्माण झाला. आदिवासी समूदाय भाजपला आपला पक्ष मानतात. ४० पैकी ३४ राखीव जागांवर भाजपला विजय मिळाला आहे. भाजपनेच देशाला पहिल्या आदिवासी राष्ट्रपती दिल्या असून, भारतातील गरिबी घटत असल्याचे तज्ज्ञ सांगत आहेत, असेही मोदी म्हणाले. (Prime Minister Narendra Modi thanked the voters)

Local ad 1