बाल विवाह रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना महत्वाच्या : जिल्हाधिकारी अभिजित राऊत
नांदेड : आपल्या गावामध्ये बालविवाह (Child marriage) होत असल्याची माहिती मिळल्यास त्याला आळा घालण्यासाठी ग्रामपातळीवर पोलीस (Police) तसेच ग्रामसेवक (Gram sevak) यांनी विशेष पुढाकार घेवून बालविवाहास प्रतिबंध करावा,अशा सूचना जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिल्या. (Preventive measures important to prevent child marriage Collector Abhijit Raut)
बालविवाह निमुर्लन (Elimination of child marriage) जिल्हा कृती आराखडा (District Action Plan) विशेष आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात (Collector’s Office) आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. बैठकीला महिला व बालविकास अधिकारी रेखा काळम, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी विद्या आळणे, राज्य कार्यक्रम अधिकारी पुजा यादव, कार्यक्रम स्वयंसेवक आकाश मोरे, निलेश कुलकर्णी, दादाराव शिरसाठ उपस्थित होते.
Web Title : Preventive measures important to prevent child marriage Collector Abhijit Raut