...

अबब… नांदेड जिल्ह्यात साडेतीन लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान

नांदेड Nanded news : जिल्ह्यात सहा आणि सात सप्टेंबर दरम्यान झालेल्या अतिवृष्टीत खरीपातील पिके पुर्णपणे नष्ट झाली आहेत. प्राथमिक नजर अंदानुसार 3 लाख 61 हजार 577 हेक्टर क्षेत्रावरी पिकांचे नुकसान झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली. (Preliminary estimates of crop damage on an area of 3 lakh 61 thousand 577 hectares

 

 

अतिवृष्टीमुळे जिवीत व वित्त हानी झाली आहे. पुढील काही दिवसात अतिवृष्टी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्या अनुषंगाने पालकमंत्री अशोक चव्हाण (Guardian Minister Ashok Chavan) यांनी अतिवृष्टी अनुषंगाने जिल्हयातील सर्व विभागातील अधिकारी यांची आढावा बैठक घेवून जिवीत झालेल्या घटनां व पिकांचे पंचनामे करण्याचे निर्देश दिले आहेत.  (Preliminary estimates of crop damage on an area of 3 lakh 61 thousand 577 hectares)

 

नांदेड जिल्हयात आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या तलुनेत 107 टक्के पाऊस झाला आहे. (The average sword is 107 percent)

 

जुन 2021 पासून आतापर्यात जिल्हयातील 81 मंडळामध्ये अतिवृष्टी झाली आहे. मागील 3-4 दिवसांत जिल्हयातील 51 मंडळामध्ये अतिवृष्टी झाल्याचे सांगण्यात आले.

 

मुखेड तालुक्यात 3 तर हदगांव तालुक्यात एक असे चार व्यक्ती पुरात वाहून गेल्याने मृत्यू झाला आहे.

कंधार तालुक्यात एक म्हैस, लोहा तालुक्यात एक गाय, बिलोली तालुक्यात एक वासरू व एक गाय, हिमायतनगर तालुक्यात दोन बैल असे एकूण पाच जनावरांचा पुरात वाहून मृत्यू झाला आहे, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.  (Preliminary estimates of crop damage on an area of 3 lakh 61 thousand 577 hectares)

 

जिल्हयात अंशतः पडझड झालेली कच्चे घरे
नांदेड तालुक्यात 06, लोहा तालुकयात 01, भोकर तालुक्यात 01, मुदखेड तालुक्यात 03, हदगांव तालुकयात 04 प्राथमिक अहवालानुसार नुकसान झाले आहे.

जिल्हयात  जुनपासून आतापर्यंत पाच व्यक्ती वीज पडून, 24 व्यक्ती पुरात वाहून, लहान जनावरे 36 व मोठी जनावरे 87 तसेच अंशतः पडझड झालेली 304 कच्चे घरांचे नुकसान झाले आहे.

 

जिल्हा प्रशासनाकडून मागील दोन दिवसांत झालेल्या अतिवृष्टीमुळे पुरात अडकलेल्या कुंटूर, (ता. नायगांव) येथील एक व मुखेड येथील चार व्यक्ती अशा एकूण पाच व्यक्तींना बचाव पथकाने सुखरूप बाहेर काढले आहे.  (Preliminary estimates of crop damage on an area of 3 lakh 61 thousand 577 hectares)

अतिवृष्टीमुळे जिल्हयात प्राथमिक नजर अंदानुसार 3 लाख 61 हजार 577 हेक्टर  पीक क्षेत्राचे नुकसान झाले आहे. त्यामध्ये नांदेड 4407 हे. आर, अर्धापूर 8178 हे. आर., कंधार 45165 हे. आर, लोहा-51900 हे. आर. देगलूर- 22788 हे. आर. मुखेड 65078 हे.आर., बिलोली 25890 हे.आर. नायगांव 39294 हे.आर. धर्माबाद-2577  हे.आर., उमरी-22064 हे. आर, भोकर 4894 हे .आर. मुदखेड 13539 हे. आर. हदगांव- 250 हे. आर, हिमायतनगर- 21768 हे.आर, किनवट 33785 हे. आर. क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे.

Local ad 1