नवीन घर घेताना कोणती काळजी घ्याल..? अन् होणारी फसवणूक टाळा !

घर खरेदी केल्यानंतर फसवणूक झाल्याचा प्रकार समोर येतो. मात्र, तोपर्यंत ठरलेली किमंतीते पैसे बँकेतून अथवा फायन्स कंपनीकडून कर्ज घेऊन दिलेले असाते. त्यानंतर काही करता येत नाही. सदनिका खरेदी करताना काय काळजी घेतली पाहिजे, यासाठी महारेराने मार्गदर्शन (MAHARERA GUIDELINES) सूचना जारी केल्या आहेत. (What precautions should be taken while buying a new house?)

 

 

maharera l
maharera

 

सदनिकेच्या व्यवहारामध्ये सदनिकाधारकाबरोबर इतर महत्वाच्या व्यक्तींचाही समावेश असतो. जागेचा मालक, प्रवर्तक, बिल्डर आणि त्यातील फ्लॅट घेणारा आणि आणखी एकाचा समावेश असतो, ती व्यक्ती म्हणजे जमिन मालकाचा मुखत्यार म्हणजे पॉवर ऑफ अॅटर्नी होल्डर. आज बऱ्याच वेळा घर अथवा जमिन खरेदी करताना फसवणूक झालेली पहायला मिळते, त्यामुळे याचा सर्वसामान्यांना मोठा भुर्दंड सहन करावा लागतो. (What precautions should be taken while buying a new house?)

maharera
maharera

 

 

सदनिका घेताना अशी घ्या काळजी ?

ज्या जागेवर इमारत बांधण्यात आली आहे, येणार आहे. त्याचा ७/१२ उतारा  किंवा प्रॉपर्टीकार्ड किंवा बी फॉर्म यावर धारक म्हणून नावे असलेल्या सर्व व्यक्तींनी, विकसकास कुलमुखत्यारपत्र दिले आहे का, हे पाहावे. कुलमुखत्यारपत्र रजिस्टर्ड असणे आवश्यक आहे. वकिलांनी या जागेचा सर्च घेतला आहे का, व सर्च रिपोर्ट तपासावा. विकसकास दिलेले अधिकारपत्र पाहावे. प्लॉटचे पूर्ण अधिकार/ पार्ट अधिकार आहेत का, ते तपासावे. जागा विकसकाच्या प्रत्यक्ष ताब्यात आहे का, हे पाहावे. बांधकामाचे नकाशे महापालिका किंवा जिल्हाधिकारी यांनी मंजूर केले आहेत का, हे पाहावे. मान्य नकाशामध्ये विकत घेण्यात येणारा फ्लॅट आहे का, हे पाहावे. फ्लॅटचा मजला व क्रमांक यांची खात्री करावी विभागणी केलेला फ्लॅट नाही ना याची खात्री करावी. एन.ए. परवानगी घेतली आहे का, हे पाहावे.  यू.एल.सी. ऑर्डर असल्यास व त्यावरील अटी तपासाव्यात. फ्लॅट विक्रीस बंधने आहेत का, हे पाहावे. मान्य नकाशातील अटी तपासाव्या

 

 

maharera

 

करारनामा करण्यापूर्वीची अशी घ्या काळजी

करारनाम्याचा मसुदा मागवून घ्यावा व त्याचा अभ्यास करावा. करारनाम्याचा मसुदा मागवून घ्यावा व त्याचा अभ्यास करावा. टेक्निमकल व लीगल माहिती असणाऱ्यांकडून सल्ला घ्यावा. तपासून घ्यावे. फ्लॅटच्या क्षेत्राचा कार्पेटमध्ये उल्लेख हवा. ओपन प्रायव्हेट टेरेस क्षेत्राचा वेगळा उल्लेख हवा. ताब्याची मुदत/ तारीख करारनाम्यात हवी. उशीर झाल्यास नुकसान भरपाई उल्लेख हवा. मेंटेनन्स खर्च एक रकमी, की दर वर्षी द्यायचा याची माहिती घ्यावी. करारनामा रजिस्टर्ड करावा.

 

maharera
maharera

ताबा घेताना घ्यावयाची काळजी

महापालिका हद्दीत असल्यास भोगवटा पत्र हवे. भोगवटापत्र नसताना ताबा घेणे बेकायदेशीर नाही; परंतु जागेचा वापर सुरू करणे बेकायदेशीर ठरेल व तसा वापर चालू केल्यास मनपाकडे तडजोड फी भरावी लागते. गरज वाटल्यास ती कोणी भरावयाची हे स्पष्ट ठरवून घ्यावे. मनपा करआकारणी झाली आहे, की नाही याची खात्री करावी. जमीन व इमारतीचे खरेदीखत केव्हा होणार, याबाबत विकसकाकडून हमी घ्यावी. सोसायटी होणार, की अपार्टमेंट होणार याची माहिती घ्यावी. प्रत्यक्ष खरेदीखत होईपर्यंत मेंटेनन्स कोण करणार याची माहिती घ्यावी. क्लब हाऊसच्या चार्जेसबाबत माहिती घ्यावी.

 

 

 

महारेराने केलेले आवाहान

  • फक्त महारेराकडील नेंदणीकृत प्रकल्पातच गुंतवणूक करा.
  • प्रकल्पांची सविस्तर माहिती महारेराच्या  https://maharera.mahaonline.gov.in/  संकेतस्थळावर उपलब्ध आहे. घर नोंदणी पूर्वी तपासून घ्या.
  • ज्या प्रकल्पात गुंतवणूक करताय त्याची महारेराच्या संकेतस्थाळावर प्रकल्प पूर्णतेची तारीख आहे ना, याची खात्री करुन घ्या.
  • घर नोंदणी-खरेदी करताना 10 टक्क्यांपेक्षा जास्त रक्कम देत असल्यास विकासकाला घरखरेदी करार करणे आवश्यक आहे.
  • महारेराना ठरवून दिलेल्या आदर्श खरेदी करारानुसारच करार करा
  • नोंदणी नंतर दिल्या जाणाऱ्या नोंदणीपत्रात सदनिका क्रमांक, चटई क्षेत्र, पार्किंग तपशील, एकूण किंमत ही माहिती आहे ना याची खात्री करुन घ्या…
Local ad 1