खा. प्रताप पाटील चिखलीकर, प्रविण पाटील चिखलीकर यांच्या वाढदिवसानिमित्त (Birthday) काटकळंबा येथे डास प्रतिबंधक फवारणी

कंधार : नांदेड जिल्ह्याचे खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या वाढदिवसानिमित्त कंधार तालुक्यातील काटकळंबा ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने गावात डास प्रतिबंधक फवारणी करण्यात आली. (MP PRATAP PATIL CHIKHALIKAR AND PRAVIN PATIL CHIKHALIKAR birthday)

 

भारतीय जनता पक्षाचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर व नांदेड भाजपा सरचिटणीस तथा जिल्हा परिषद सदस्य प्रविण पाटील चिखलीकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून विविध समाजभिमुख कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात ग्रामपंचायत कार्यालय काटकळंबाच्या वतीने डास प्रतिबंधक औषध फवारणी करण्यात आली. त्यातून डासापासुन होणाऱ्या आजारापासून नागरिकांचे स्वरंक्षण करण्यासाठी फवारणी करण्यात आली.
(MP PRATAP PATIL CHIKHALIKAR AND PRAVIN PATIL CHIKHALIKAR birthday)

यावेळी सरपंच प्रतिनिधी रावसाहेब बस्वदे, उपसरपंच शिवाजी पाटील वाकोरे, कंधार भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष साईनाथ कोळगीरे, ग्राम पंचायत सदस्य माधव वाकोरे, गजानन कुठारे, वजीर पठाण, अशोक चावरे, माधव कांबळे, गजानन कांबळे, तुळशिराम चावरे, ग्राम विकास अधिकारी व्यावहारे, भाऊसाहेब कांबळे, माजी उपसरपंच गोविंद वाकोरे, जेष्ठ नागरिक गंगाराम बस्वदे, व्यंकटराव लोहकरे, नवाज सय्यद, कमलाकर गोरकवाड, गजानन विभूते, माधव वाकोरे, नरेंद्र चावरे, मगदुम सय्यद, बालाजी कन्नेवार, कासिम पठाण,आदी गावातील नागरिक व भाजपा पदाधिकारी उपस्थित होते. (MP PRATAP PATIL CHIKHALIKAR AND PRAVIN PATIL CHIKHALIKAR birthday)

Local ad 1