नांदेडचे भूमिपुत्र तथा नालगोंडाचे जिल्हाधिकारी प्रशांत पानपट्टे यांना उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार जाहीर
नांदेड : जिल्ह्यातील काटकळंबा गावचे सुपुत्र आणि तेलंगणातील नालगोंडा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी प्रशांत जीवनराव पानपट्टे पाटील (Nalgonda District Collector Prashant Jeevanrao Patil) यांना तेलंगणा राज्य निवडणूक आयोगाने (State Election Commission) उत्कृष्ट जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून गौरवित केले आहे. त्यांना मिळालेल्या पुरस्कारा बद्दल त्यांचे कौतूक होत आहे. (Prashant Patil, District Collector of Nalgonda, Bhumiputra of Nanded)
भारतीय निवडणूक आयोगाकडून दरवर्षी 25 जानेवारी राष्ट्रीय मतदार दिनाच्या दिवशी हे पुरस्कार वितरीत केले जातात. राज्यातील निवडणुकीचे काम केलेले सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी त्याच्या कामकाजाप्रती दिलेले योगदान विचारात घेऊन या निवडणुकीसाठी प्रभावी व उत्कृष्ट कामगिरी केलेल्या जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी, उपजिल्हाधिकारी व उपजिल्हा निवडणूक अधिकारी, निवडणूक निर्णय अधिकारी व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांना पुरस्कार दिले जातात. (Prashant Patil, District Collector of Nalgonda, Bhumiputra of Nanded)