Prakash Ambedkar : प्रकाश आंबेडकर यांनी औरंगजेबाच्या कबरीला दिली भेट

Prakash Ambedkar : वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर (Vanchit Bahujan Aghadi Chief Adv. Prakash Ambedkar) यांनी खुलताबाद येथील औरंगजेबाच्या कबरीला (Tomb of Aurangzeb) भेट दिली. (Adv Prakash Ambedkar visited Aurangzeb’s tomb)

 

 

यावेळी माध्यमांशी बोलताना औरंगजेबावरुन वाद निर्माण करणाऱ्यांनी आधी स्वत:चचे चारित्र्य बघावे. तुम्ही औरंगजेबाच्या दरबारात कामाला होतात की नाही, तिकडे नोकऱ्या करायचात की नाही, हे सांगावे. आम्ही तर दरबारात साधे चोपदारही नव्हतो. त्यामुळे लोकांना शहाणपणा शिकवताना प्रथम आपला इतिहास तपासावा, अशा शब्दांत फटकारले आहे.

 

 

Adv Prakash Ambedkar visited Aurangzeb's tomb

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) (Chhatrapati Sambhajinagar (Aurangabad) जिल्ह्यात एका कार्यक्रमाच्या निमित्ताने आल्यानंतर अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांसोबत औरंगजेबाच्या कबरीला भेट दिली. अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी भेट दिल्यानंतर आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. अलीकडच्या काळात राज्यात औरंगजेबाच्या फोटोवरुन राज्यात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. आंबेडकर यांनी औरंगजेबाच्या कबरीला भेट दिली. यावरुन भाजपने शिवसेनेवर निशाणाही साधला आहे. कारण प्रकाश आंबेडकर हे सध्या उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेबरोबर आहेत.

Local ad 1