शेतकऱ्यांच्या  बँक खात्यात  PM किसान योजनेचा 18 वा हप्ता कधी जमा होणार ; KYC केली असेल तरच जमा होणार पैसे 

 

Pradhan Mantri Kisan Samman Nidhi Yojana In Marathi : दसरा आणि दिवाळी काही दिवसांवर येऊन ठेपले असून, आता केंद्र सरकार शेतकऱ्यांना फेस्टिवल गिफ्ट देणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे 5 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा (Pradhan Mantri Kisan Samman Nidhi Yojana In Marathi) 18 वा हप्ता जारी करणार आहेत. त्यामुळे 5 ऑक्टोबरला शेतकऱ्यांच्या खात्यात 2 हजार रुपये जमा होणार आहेत.

PM किसान सन्मान निधी योजना ही DBT योजना आहे.  PM किसान सन्मान अंतर्गत आत्तापर्यंत 9.25 कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 3.25 लाख कोटी रुपये हस्तांतरित करण्यात आले आहेत. 5 ऑक्टोबर 2024 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्रातील वाशिम येथे प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा 18 वा हप्ता 9.5 कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित करतील. मोदी सरकार सलग तिसऱ्यांदा सत्तेवर आल्यानंतर 18 जून 2024 रोजी 17 वा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात आला होता. त्यानंतर आता 5 ऑक्टोबर 2024 ला 18 वा हप्ता देण्यात येणार आहे.

येत्या काही दिवसांत महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर 5 ऑक्टोबर 2024 रोजी पंतप्रधान किसान सन्मान योजनेंतर्गत 9.5 कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 2000 रुपये वर्ग केले जाणार आहेत. त्याच दिवशी हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठीही मतदान होणार आहे.

 

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदी सरकारने अंतरिम अर्थसंकल्प सादर करताना ही योजना सुरू केली होती. पीएम किसान योजनेंतर्गत, शेतकऱ्यांच्या बँक खात्यात एका वर्षात तीन हप्त्यांमध्ये 6000 रुपये थेट हस्तांतरित केले जातात. जेणेकरून त्यांना महागड्या बियाणे आणि खतांपासून दिलासा मिळू शकेल. पीएम किसान योजनेअंतर्गत आतापर्यंत 17 हप्त्यांमध्ये 9.25 कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये 3.25 लाख कोटी रुपये हस्तांतरित करण्यात आले आहेत.

 

ई-केवायसी आवश्यक

पीएम किसानच्या सरकारच्या अधिकृत वेबसाइटनुसार, नोंदणीकृत शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी ई-केवायसी असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. OTP बेस्ट ई-केवायसी PM Kisan पोर्टलवर उपलब्ध आहे. याशिवाय, बायोमेट्रिक आधारित ई-केवायसीसाठी जवळच्या सीएससी केंद्रांशी संपर्क साधता येईल.

 

 

Local ad 1