...

Pradhan Mantri Crop Insurance Scheme । पिक विमा भरपाईपासून अडिच हजार शेतकरी वंचित ! 

Pradhan Mantri Crop Insurance Scheme । नायगाव : खरीप हंगाम २०२२ मध्ये सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना अतिवृष्टीमुळे प्रधानमंत्री पीक विमा योजनेतून (Pradhan Mantri Crop Insurance Scheme) पीक विमा भरपाई मिळेल, या आशेवर शेतकरी आहेत. नायगाव तालुक्यातील गडगा परिसरातील सुमारे अडीचहजार पेक्षा अधिक शेतकरी पिक विमा भरूनही नुकसान भरपाई पासून वंचित आहेत. नुकसानीचे सर्वेक्षण न झालेल्या शेतकऱ्यांना नूकसान भरपाई मिळणार नसल्याचे सांगितले. शेतकऱ्यांनी संताप व्यक्त करत आहेत. 

 

Gazetted Officer Non Gazetted। राज्यातील 74 राजपत्रित-अराजपत्रित नायब तहसीलदारांना तहसीलदारपदी पदोन्नती

 

नायगाव तालुक्यातील गडगा येथील एक हजार तसेच परीसरातील गावचे १४५७ अशा एकूण २ हजार ४५७ शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होवून खरीप हंगाम २०२२ चा पिक विमा उतरविला (Crop insurance for Kharif season 2022)  होता. गेल्या वर्षी पेरणीनंतर पावसाने ओढ दिल्याने पिकांच्या उत्पादनात घट झाली. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने प्राप्त अधिकाराअन्वये पिक विमा योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना विमा कंपनीने २५ टक्के रक्कम अग्रीम स्वरूपात अदा करावी, असे निर्देश दिले होते. त्यानूसार बहुतांश ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यावर ती रक्कम जमा ही झाली. दरम्यान, डिसेंबर महिन्यात सलगपणे तीन वेळा अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नूकसान झाले होते. त्यावेळी प्रशासनाने देखील नुकसानीची पाहणी करून पंचनामे केले.

 

 

बहुतांश शेतकऱ्यांनी जिल्हा प्रशासनाने केलेल्या आवाहनानूसार पीक नूकसानीची माहीती विमा कंपनी, कृषी विभाग यांना देवून तक्रारी केल्या होत्या. त्यानंतर नूकसानीची व्याप्ती अन् विमा कंपनीकडील अपुरे मनुष्यबळ या कारणाने बहुतांश शेतकऱ्यांच्या नुकसानीचे सर्वेक्षण विमा कंपनीकडून झालेले नाही. यात शेतकऱ्यांची काहीही चूक नसताना आता विमा कंपनीने सर्वेक्षण न झालेल्या शेतकऱ्यांना नूकसान भरपाई मिळणार नसल्याचे सांगितले. त्यामुळे नायगाव तालुक्यातील गडगा परीसरात  नूकसानग्रस्त शेतकरी भरपाई पासून वंचित राहिले आहेत.

 

आमचा काय दोष?  शेतकऱ्यांचा सवास

गेल्या खरीप हंगामात नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यात तीन वेळा अतिवृष्टी झाल्याने सोयाबीनचे पीक मातीमोल झाले.त्याचवेळी विमा कंपनीकडे आम्ही २४ तासाच्या आत विमा कंपनीच्या टोल फ्री क्रमांकावर तक्रार दाखल केली.आम्हाला कंपनीने विमा क्लेम आयडी नंबर दिला.सर्वेक्षण त्यांनी केले नाही.यात आमचा काय दोष? लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी यांनी आम्हाला न्याय द्यावा, तसेच चूक कंपनी आहे, त्यात आमचा दोष कुठे असा सवाल माधवराव जाधव, बालाजी पवळे, संजय खुजडे, बालाजीराव शिंदे, शिवाजीराव शिंदे, शिवराज मुंडकर यांनी केला आहे.

Local ad 1