Big breaking news। वीज कर्मचाऱ्यांना संपावर जाण्यास मनाई, मेस्मा कायदा लागू
मुंबई : राज्यातील शासकीय वीज कंपन्यांमध्ये कार्यरत अभियंते, तंत्रज्ञ, कर्मचारी आणि कंत्राटी कर्मचारी व कामगार यांनी आज रविवारी रात्री १२ वाजतापासून दोन दिवसीय (२८ आणि २९ मार्च) संपावर जाण्याचा इशारा दिल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने वीज कंपन्यांच्या अधिकारी-कर्मचारी या सर्वांना महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा परिरक्षा अर्थात मेस्मा कायदा (Maharashtra Essential Services Protection (MESMA) Act) लागू केला केला आहे. (Power workers banned from going on strike, Mesma law enforced)
मला दिल्लीत पाठविण्यामध्ये अब्दुल सत्तारांची महत्वाची भूमिका : खासदार इम्तियाज जलील
महानिर्मिती, महावितरण आणि महापारेषण (Mahanirmithi, Mahavitaran and Mahapareshan) या शासनाच्या वीज कंपन्यांच्या अधिकारी-कर्मचारी (Officers-employees of power companies) यांच्या सेवा या अत्यावश्यक सेवा असून या अधिकारी- कर्मचाऱ्यांसाठी महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा परिरक्षा अधिनियम अर्थात *मेस्मा* लागू करून त्यांना संपावर जाण्यास प्रतिबंध करण्यात येत असल्याचे राज्य शासनाने आज राजपत्रात प्रसिद्ध आदेशात म्हटले आहे. (Power workers banned from going on strike, Mesma law enforced)
Related Posts