Power supply interrupted । पश्चिम महाराष्ट्रातील २० हजार ग्राहकांना महावितरणचा शाॅक

Power supply interrupted पुणे : वीजबिलांचा भरणा न केल्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात (Western Maharashtra) घरगुती,वाणिज्यिक व औद्योगिक (Domestic, Commercial, Industrial) वर्गवारीतील १५ लाख ७४ हजार ५८० वीजग्राहकांकडे ३१० कोटी १७ लाख रुपयांची थकबाकी आहे.

Power supply interrupted पुणे : वीजबिलांचा भरणा न केल्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात (Western Maharashtra) घरगुती,वाणिज्यिक व औद्योगिक (Domestic, Commercial, Industrial) वर्गवारीतील १५ लाख ७४ हजार ५८० वीजग्राहकांकडे ३१० कोटी १७ लाख रुपयांची थकबाकी झाली आहे. यात सर्वाधिक घरगुती १३ लाख ९८ हजार ४४९ ग्राहकांकडे२१८ कोटी ३० लाख तसेच वाणिज्यिक १ लाख ५२ हजार ९०० ग्राहकांकडे ६२ कोटी ९ लाख तरऔद्योगिक २३ हजार २३१ ग्राहकांकडे २९ कोटी ७८ लाख रुपयांची थकबाकी आहे. त्यामुळे महावितरणकडून वसूली मोहिमेला वेग देण्यात आला असून, या थकबाकीदारांचा वीजपुरवठाखंडित करण्यात येत आहे. (Power supply interrupted to 20 thousand consumers in western Maharashtra)

 

 

दरम्यान, वीजबिलांच्याथकबाकीमुळे गेल्या २५ दिवसांमध्ये पश्चिम महाराष्ट्रातील घरगुती, वाणिज्यिक वऔद्योगिक २० हजार ३२८ थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. यामध्येपुणे जिल्हा- ११,१८२ सातारा- १८२३, सोलापूर- ६००८, कोल्हापूर- २०९४ आणि सांगलीजिल्ह्यातील २७७६ थकबाकीदारांचा समावेश आहे.

 

पुणे प्रादेशिकविभागात सद्यस्थितीत घरगुती, वाणिज्यिकव औद्योगिक ग्राहकांकडे (कंसात ग्राहक) पुणे जिल्हा- १९८ कोटी ३ लाखरुपये (७,७६,४९८), सातारा- २२ कोटी २ लाख(१,८६,४७९), सोलापूर- ४९ कोटी ०६ लाख (२,५३,९३९), कोल्हापूर- २० कोटी ३३लाख (१,७७,९३८) आणि सांगलीजिल्ह्यात २०कोटी ७३ लाख रुपयांची (१,७९,७२६) थकबाकी आहे. वीजबिलांचा नियमितभरणा होत नसल्याने महावितरणची आर्थिक कसरत सुरू आहे. त्यामुळेवीजग्राहकांनी चालू व थकीत बिलांचा भरणा करून सहकार्य करावे, असे आवाहन पुणेप्रादेशिक संचालक अंकुश नाळे (Pune Regional Director Ankush Nale) यांनी केले आहे.

 

थकबाकीदारांकडूनवीजबिलांच्या रकमेचा भरणा होत नसल्याने नाईलाजाने वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाईवेगाने सुरू करण्यात आली आहे. आता थकीत रक्कम किती आहे हे न पाहता नियमानुसारवीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई सुरु आहे. तसेच थकबाकीमुळे वीजपुरवठा खंडितकेलेल्या वीजजोडण्यांची स्वतंत्र पथकांद्वारे पडताळणी सुरु आहे. यात परस्पर इतरठिकाणावरून अनधिकृत वीजपुरवठा घेतल्याचे आढळल्यास नियमानुसार कारवाई करण्यात येतआहे.

शनिवार व रविवारी वीजबिल भरणा केंद्र सुरू

पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा व सोलापूर (Pune, Kolhapur, Sangli, Satara, Solapur)जिल्ह्यातील वीजग्राहकांना चालू व थकीत वीजबिलांचा भरणा करणे सोयीचे व्हावे यासाठीमहावितरणचे अधिकृत वीजबिल भरणा केंद्र शनिवारी (दि. ३०) व रविवारी (दि. ३१)सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी कार्यालयीन वेळेत सुरू ठेवण्यात येणार आहे. यासोबतच वीजग्राहकांनाwww.mahadiscom.in यावेबसाईटवर तसेच महावितरणच्या मोबाईलअॅपद्वारे केव्हाही व कुठूनहीऑनलाइन पध्दतीने विनामर्यादा वीजबिलाचाभरणा करता येतो. या व्यतिरिक्तमहावितरणने ५ हजार रुपयांपेक्षा अधिक बिल असणाऱ्या सर्व लघुदाब ग्राहकांनाआरटीजीएस किंवा एनईएफटीद्वारे देयक भरण्याची सुविधाउपलब्ध करून दिलेली आहे.

 

Local ad 1